महाडिक परिवाराची दातृत्वाची परंपरा कायम मेघोली धरण दुर्घटनेतील मोहीते कुटुंबीयांना एक लाखाची मदत..

कोल्हापूर प्रतिनिधी मार्था भोसले : कोणत्याही आपत्तीच्यावेळी जनतेच्या मदतीसाठी धावून जाण्याची महाडिक परिवाराची परंपरा आहे. २००५ चा महापूर असो, २०१९/ २०२१, चा प्रलय असो किंवा सध्याची मेघोली धरण दुर्घटना गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विरूध्दची लढाई, महाडिक परिवारानं सातत्यानं सामाजिक बांधिलकी जपत, हजारो कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे.

संसदरत्न भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सदस्य, मा.खासदार धनंजय महाडिक यांनी मेघोली धरणाची पाहणी करुन, शळोलीमार्गे पाहणी करत ओढ्यातून चालत तळकरवाडीत नवले येथेल मोहीते कुटुंबीयांना सांत्वनासाठी भेट दिली होती. त्यावेळी मा.महाडीक यांनी मृत जनावरांसाठी भाजपातर्फे एक लाख रू.मदत देण्याचे जाहीर केले होते. जाहीर केलेली मदत युवाशक्ती कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा. पृथ्वीराज महाडिक, यांच्या हस्ते मोहीते कुटुंबीयांना देण्यात आले.
या वेळी राहुल देसाई, प्रविणसिंह सांवत, सरपंच सुतार, प्रविण पाटील, प्रकाश पाटील, मारूती तळकर, नंदकुमार शिंदे, अलकेदादा कांदळकर, प्रकाश वास्कर, बाजीराव देसाई, प्रविण आरडे, ज्ञानदेव पाटील, पत्रकार समीर मकानदार, शशिकांत पाटील युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *