प्रगतशील यशस्वी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माधव नगर ग्रामपंचायत कडून जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्या हस्ते गरजू आशा वर्कर यांना सायकली वाटप

 

प्रतिनिधी मोहन सतरा ळकर

प्रगतशील यशस्वी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माधव नगर ग्रामपंचायत कडून जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्या हस्ते गरजू आशा वर्कर यांना सायकली वाटप करण्यात आल्या.

Advertisements

 

 

यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री डोंगरे म्हणाले भारतासारख्या प्रगतशील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अनेक अडचणीच्या काळामध्ये धाडशी मोठे निर्णय घेऊन भारताच्या नागरिकांना योग्य दिशा व न्याय देण्याचे काम केले आहे.
म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त माधव नगर ग्रामपंचायतीने गरजू आशा वर्कर त्यांना सायकली वाटप करण्याचे उपक्रम आयोजन केल्यामुळे विशेष कौतुक करावेसे वाटते.

देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी यशस्वीरित्या धाडसी निर्णय घेऊन कोरोना सारख्या महामारी विषाणूला रोखण्यात यश मिळवले असून भारत महासत्ता होण्यासाठी सतत प्रयत्नशील आटोकाट प्रयत्न करत आहेत.
अशा कटीन काळात धाडशी निर्णय घेऊन भारत देशाला दिशा व न्याय देण्याचे काम केले आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायतीने गरजू आशा वर्कर त्यांना सायकली वाटप करण्याचे उपकरण आयोजन केल्यामुळे योग्य व कौतुकास्पद आहे.
म्हणून आज या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केल्याबद्दल ग्रामपंचायतीचे आभार मानतो.

व नरेंद्र मोदीजीच पंतप्रधान पुढील काळामध्येही आम्हाला पंतप्रधान हवे आहेत त्याबद्दल सर्व स्तरातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचा वर्षाव होतोय ह्याचा मला अभिमान वाटतोय पुढील काळामध्ये मानव नगर ग्रामपंचायत मधील नागरिकांना कोणतेही अडचण असेल त्यांना सर्वतोपरी मदत करू व माधव नगर ग्रामपंचायतीचे काम करत असलेल्या सर्व सदस्य समाधान कारक काम करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

या वेळी प्रमुख उपस्थिती सरपंच अनिल पाटील, उपसरपंच बाळासाहेब मगदुम, ग्रामपंचायत सदस्य शोभा चव्हाण, राजेश्री पाटील, जयश्री पिसे,रेखा बनकरी, शोभा जाधव, महेश साळुंखे,देवराज बागल,देवा जाधव,बबन आवळे,अजय आदाटे, प्रविण जाधव, सचिन पाटील, मिलींद पाटील, सतिष पाटोळे, गजानन बाबर,जितू पवार, इत्यादी उपस्थित होते.

4 thoughts on “प्रगतशील यशस्वी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माधव नगर ग्रामपंचायत कडून जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्या हस्ते गरजू आशा वर्कर यांना सायकली वाटप”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *