शाहुपूरी पोलीसांची धडक कारवाई…

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 55 Second

विशेष वृत्त जावेद देवडी

कोल्हापूर पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी माला विरुध्दच्या गुन्हयांना प्रतिबंध होणे
करता तसेच गुन्हे उघडकिस आणणे करीता सक्त पेट्रोलिंग करुन कायदेशिर कारवाई करणेबाबत
आदेश दिले आहेत.

मा.पोलीस अधिक्षकसो यांनी दिले आदेशा प्रमाणे शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस

निरीक्षक श्री. राजेश गवळी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी माला विरुध्दच्या गुन्हयांना प्रतिबंध
करणे तसेच घडले गुन्हे उघडकिस आणणे करीता सुचना दिले प्रमाणे शाहुपूरी पोलीस ठाणे गुन्हे
प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांना बातमी मिळाल्याप्रमाणे पोलीस ठाणे रेकॉर्डवरील आरोपी
गुरुराज माजतेश आतनुरे व.व.२२ रा.उलपे मळा,शुगरमिल,कसबा बावडा,कोल्हापुर यास पकडुन
त्याचेकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने केदारलींग बेकरी मध्ये घुसुन चोरी केल्याची कबुली
देवुन त्याने चोरलेले रोख रक्कम १०,५००/- रुपये हस्तगत केले आहेत.तसेच त्याचे जवळ मोटर
सायकल बाबत कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने सदरची मोटर सायकल ही सुमारे २० दिवसापुर्वी
कागल येथुन चोरी केली असल्याचे सांगितले असुन,सदर मोटर सायकल चोरी झालेबाबत कागल
पोलीस ठाणे गु र न ३४६/२०२१ भा द वि स कलम ३७९ प्रमाणे दाखल आहे.त्याचेकडुन केदारलींग
बेकरी येथील चोरी केलेला मुददेमाल रोख रक्कम १०,५०० रु व हीरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकलसह
मिळुन एकुण ३०,५००/- रुपयेचा मुददेमाल हस्तगत करणेत आला आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, मा.अप्पर पोलीस अधिक्षक
तिरुपती काकडे,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, मा.पोलीस निरीक्षक
राजेश गवळी,शाहुपूरी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार संदिप जाधव,

पो. हे. कॉ. १४५९ ऋषिकेश पवार,पो ना १२२२ धर्मेंद्र बगाडे,पो कॉ २३१९ सुशिल सांवत,पो कॉ ३ सागर माने,पो कॉ १८४७ शुभम संकपाळ यांनी केली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *