विशेष वृत्त : मार्था भोसले
कोल्हापूरातील नामांकित मॅडीज डी आय डी फिटनेस अकॅडमी अंतर्गत चालणाऱ्या डी आय डी वुमन्स क्लब ऑफ गार्गीज क्लब तर्फे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात.
असाच एक झिम्मा फुगडी च्या स्पर्धे अंतर्गत पारंपरिक वेशभूषा, उखाणे, आणि ग्रुपचा झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,
कोरोनाच्या काळात सुद्धा शासनाचे नियम पाळून महिलांना उत्करष्टरित्या व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे महिलांना बऱ्याच महिन्यांनंतर मनमोकळेपणाने बाहेर पडून आपली कला सादर करण्याची संधी मिळाली.
या उपक्रमात परीक्षक म्हणून मनीषा रणमाळे, सरोज बाहेती यांनी काम पाहिले तर १२७ महिलांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला होता.
पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक वैशाली शिर्के,व्दितीय क्रमांक अर्चना सावंत यांनी पटकावला, तर उखाणे स्पर्धेत प्रथम क्रमांक विशाखा जाधव, द्वितीय क्रमांक राधिका कुमठेकर आणि ग्रुप झिम्मा फुगडी स्पर्धेत राधिका कुमठेकर ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाऊन उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
यावेळी संस्थेचे संस्थापक मास्टर मॅडी सर, अध्यक्षा अश्विनी ढेंगे,उपाध्यक्षा मृणालिनी चव्हाण, कोषाध्यक्षा सारिका भोसले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम गुरुवारी हॉटेल रेडियत येथे पार पडली.