जाहीरात
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
दिपावली पाडवा फराळ व चहापान निमित्ताने निमंत्रित युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे राज्य कार्याध्यक्ष राजरत्न हुलस्वार यांच्या बंगल्यावर संघाचे प्रमुख पदाधिकारी यांचे बैठक घेऊन संघाच्या महत्वाचे विषयावर निर्णय घेण्यात आला.
नविन नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन व कार्य शाळा घेण्याचे ठराव करण्यात आले.
संपुर्ण महाराष्ट्रात महीला सदस्य पदाधिकारी यांच्या साठी विसेष कार्यक्रम राबविणे महीला सदस्या नोंदणी साठी सवलती देण्याचे ठरवले.
महाराष्ट्रात युवा पत्रकार संघाचे सदस्य नोंदणी झपाट्याने वाढत आहे. चांगले लोक पत्रकार सहभाग व्हावे यासाठी प्रमुख पदाधिकारी यांचे काळजीपुर्वक प्रयत्न सुरू असुन लवकरच २०२२ सालचे कार्यकारणी जाहीर करण्यात येईल.
युवा पत्रकार संघाच्या कार्याची वाहताहत संपुर्ण महाराष्ट्रात होत आहे. याचीच दखल घेऊन संघाने
काही महत्त्वाच्या निर्णय घेऊन पुढील दिशा व वाटचाल करणार आहे.
पदाधिकारी व सभासद यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून यशस्वी रित्या कार्य करण्याची गरज असुन जबाबदारी व प्रयत्नशील कार्य करणाऱ्या पदाधिकारी सभासद यांना महत्व देऊन सन्मान पुर्वक स्थान देण्याचे ठरवले. संघाचे मानहानी व अवमान कारक कृत्य करणाऱ्या सभासदांना कायमचे नारळ देऊन कायदेशीर कारवाई समज देऊन निलंबित करण्यात येईल. या वेळी गोपनीयतेची शपथ घेण्यात आली.
या बैठकीला संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे, राज्य कार्याध्यक्ष राजरत्न हुलस्वार, राज्य उपाध्यक्ष जावेद देवडी, प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव वळवडे, राज्य सरचिटणीस अजय शिंगे, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दिपावली आनंदाचा सना दिवशी आपल्या बंगल्यावर फराळासाठी येऊन बैठक घेतल्या बद्दल राज्य कार्याध्यक्ष राजरत्न हुलस्वार व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने शुभेच्छा दिल्या, हुलस्वार कुटुंबीयांच्या वतीने वैशिष्ट पुर्वक नियोजन केले होते विशेषतः वेगवेगळ्या प्रकारच्या फराळ ड्रायपुड व मिठाई याचे आस्वाद घेत पदाधिकार्यांनी समाधान पुर्वक दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
————————- जाहीरात ——————-