विशेष वृत्त : अजय शिंगे
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणूका बिनविरोध करण्याचे आदेश दिल्ली येथून आल्या नंतर आज तत्काळ भाजप आघाडीचे उमेदवार माजी आमदार आमल महाडिक यांनी माघार घेतल्याने
पालकमंत्री सतेज पाटील हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप चे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांची नवी दिल्ली मध्ये बैठक झाली या बैठकीत महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणूका बिनविरोध घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
काही वेळातच चंद्रकांत पाटील व अमित शहा यांनी भा.ज.पा. प्रवक्ता धनंजय महाडिक यांना फोन करून अमल महाडिक यांचा अर्ज मागे घेण्याची सूचना केली या नंतर महादेवराव महाडिक यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर अर्ज मागे घेण्याचे निश्चित करण्यात आले.
तदनंतर महाराष्ट्र विधान परिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूक 2021 मध्ये बिनविरोध निवडून आलेले उमेदवार सतेज उर्फ बंटी. डी. पाटील (पक्ष- इंडियन नॅशनल काँग्रेस) यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, खासदार संजय मंडलिक यांच्या चेहऱ्यावर विजयाचे आनंद दिसत होता.