गडहिंग्लज नरेवाडी येथील संगोपन हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटरचा लोकार्पन सोहळा संपन्न

0 0

Share Now

Read Time:5 Minute, 46 Second

गडहिंग्लज प्रतिनिधी : तालुक्यातील कै. गुंडू (हमाल) अण्णाप्पा पाटील शैक्षणिक सामाजिक मेडीकल बहूउद्देशीय चॅरिट्रेबल ट्रस्ट संचलित संगोपन हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर आणि ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर नरेवाडी या परिवारातर्फे गोकूळचे संचालक मा. नाविद मुश्रिफ यांच्या प्रमूख़ उपस्थितीत व रेडेकर कॉलेजच्या अध्यक्षा श्रीमती अंजनाताई रेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पन सोहळा संपन्न झाला.

यावेळी दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या भाषणात बोलताना युवा नेते मा. नाविद मुश्रीफ म्हणाले, “गडहिंग्लज सारख़्या ग्रामीण भागात मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल उभारून संगोपनचे चेअरमन मच्छिंद्रनाथ पाटील यांनी वैद्यकिय सेवेचे एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे. मुंबईसारख़्या मेट्रोपॉलिटीन सिटीत राहून्ही त्यांची गावाशी नाळ जुडलेली आहे. मोतीबिंदू उपचारासारख़्या अनेक सोयीसुविधासाठी लोकांना सांगलीला जावे लागते ते आता संगोपन हॉस्पीटल मध्येच मिळणार आहेत. त्यामुळे रूग्णांना ही सहज साध्य उपचार घेण्यास सोप झालं. भविष्यात कोणत्याही साधन सुविधा वा शासकिय मदत लागल्यास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून नक्कीच करू जेणेकरून तालुक्‍यातील चंदगड आजरा गडिंग्लज ग्रामीण इथल्या नागरिकांना याचा लाभ होईल.”
प्रास्ताविक भाषणात, संगोपनचे एक्स्झिक्यूटीव्ह डायरेक्टर डॉ. अर्जुन शिंदे सर म्हणाले, “ग्रामीण भागातील या हॉस्पिटल मध्ये आम्ही कॅन्सर सह आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे स्त्रीरोग आणि प्रसूती विभाग, बालरोग विभाग, नेत्ररोग(मोतीबिंदू शस्त्रक्रिया), दंतरोग, कान, नाक व घसा विभाग, शस्त्रक्रिया विभाग, जनरल मेडिसीन विभाग, पॅथॉलॉजी विभाग, रेडीओलॉजी विभाग, अपघात विभाग, ओपीडी व आइपीडी, अतिदक्षता विभाग आणि ऑपरेशन थिएटर, स्पेशल वार्ड, डिलक्स वार्ड असे विभाग कार्यान्वीत केले आहेत. त्याचा भागातील गरजूंनी लाभ घ्यावा.”
अंजनाताई रेडेकर यांनी अध्यक्षीय भाषणातून संगोपन हॉस्पिटलला लागेल ती मदत पुरुवू अशी ग्वाही दिली. संगोपनचे चेअरमन मच्छिंद्रनाथ पाटील यांच्या कार्याचा गौरव त्यांनी केला.
संगोपनचे चेअरमन मच्छिंद्रनाथ पाटील यांचा मुंबईतील मित्र परिवार असलेल्या माऊली फाऊंडेशन काळबादेवी तर्फे संगोपन हॉस्पीटल एंड रिसर्च सेंटरला सुमारे एक लाख एक्कावन्न हजार रुपयांची मदत जाहिर केली. माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. हनुमंत सिंगन यांनी ही घोषणा केली.
हॉस्पीटल उभारणी बद्दल वाटंगीचे सरपंच शिवाजी नांदवडेकर गुरूजींनी चेअरमन मच्छिंद्रनाथ पाटील यांची कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ सुनंदा नाईक यांनी केले तर बिजनेस एन ब्रॅडींग कन्सलटंट अमरसिंह राजे जगदाळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

यावेळी ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे चेअरमन उदय देशमुख रिसोर्स डायरेक्टर डॉ. प्रताप राजेमहाडिक, केदारी रेडेकर उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री अनिरुध्द रेडेकर, माजी जि.प.सदस्य जयकुमार मुन्नोळी, गंगाधर व्हसकोठी, ट्रस्टी विशाल पाटील, नरेवाडीचे सरपंच अंकुश रणदिवे, अखिल भारतीय सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, ट्रस्टी सौ सिमा पाटील,       सौ. प्रणल पाटील, काळबादेवी येथील माऊली फाऊंडेशनचे अनिल कदम, निवृत्त एसीपी तानाजी घाडगे, निवृत्त एसीपी प्रशांत बगाडे, संतोष गुजर, जयंत ओक, डॉ. कैलास गोसावी, डॉ. शशिकांत शेलार, श्री शेखर रुमडे, अंकुश जांभळे, अरूण जांभळे, जगदीश म्हात्रे, सुनिल जांभळे, सौ. जयश्री सिंगण, सौ.वनिता जांभळे,सौ.बेबीताई जांभळे, कु. प्रियंका जांभळे आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-–—–––जाहिरात———-

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *