जिल्ह्याचे दोन्ही मंत्री केडीसीसी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक म्हणून बिनविरोध निवड..

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 30 Second

विशेष वृत्त : शिवाजी शिंगे

कोल्हापूर दि. २० : जिल्ह्याचे दोन्ही मंत्री जिल्हा बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जिल्ह्यात राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची १५ दिवसापूर्वीच जिल्हा बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली त्याच बरोबर आज ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची केडीसीसी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. कागल तालुका विकास सेवा संस्था गटातून त्यांचा एकमेव अर्ज राहिल्याने निवडणूक अधिकारी श्री. अरुण काकडे यांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांना बिनविरोध घोषित केले. त्याबद्दल पालकमंत्री व  गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजयदादा मंडलिक, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले, राजेश लाटकर, संभाजीराव भोकरे आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मंत्री श्री. मुश्रीफ यांचा सत्कार झाला

यावेळी मंत्री श्री. मुश्रीफसाहेब म्हणाले, “गेली सहा वर्ष बँकेने  फिनिक्स पक्ष्याप्रमाणे घेतलेली गरुडभरारी लौकिकास्पद आहे. शेतकरी सभासदांच्या विश्वासाचे फलित म्हणजे माझी बिनविरोध झालेली निवड आहे. सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कार्यरत राहू

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *