कोल्हापूर प्रतिनिधी दि.२७ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही कोल्हापूर जिल्ह्यातील शेतक-यांच्या सर्वांगीण विकासाची वरदायिनी असून जिल्ह्याच्या सहकाराची मातृसंस्था आहे. या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक ०५/०२/२२ रोजी होत आहे.
भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, जनसुराज्य, ताराराणी पक्ष व मित्र पक्षांनी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्यावतीने हि निवडणूक लढवली जात आहे. आज भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने भाजपा प्र.का.सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. मिटिंगमध्ये मतदार यादीचे वाचन करून प्रमुख पदाधिकारी यांनी मतदारांपर्यंत संपर्क साधण्यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
उपस्थित पदाधिकारी यांनी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांचा जोमाने प्रचार करून मतदारांना भेटून कपबशी चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगतिले. याप्रसंगी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, विजय आगरवाल, आशिष कपडेकर, भरत काळे आदी उपस्थित होते