Share Now
विशेष/प्रतिनिधी, दि.२९ : राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आज दुपारी ४ च्या दरम्यान जलसंपदा विभागाला यश आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता (कोल्हापूर) रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे.
आज सकाळी साडे नऊ च्या दरम्यान राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना अपघाताने सर्व्हिस गेट ओपन झाले होते. यामुळे नदीपात्राची पाणी पातळी वाढत होती. नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला होता.
नदीकाठच्या पाण्यामध्ये उतरण्यापासून परावृत्त करण्यात आली होती . पाण्याचा अंदाज घेवून शक्य असणाऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नदीकाठावरील मोटार व पंपसेट काढून सुरक्षित ठिकाणी न्यावेत, असे आवाहन सकाळी जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता(श्रेणी १) संदीप दावणे यांनी केली होती.
जलसंपदा विभागाच्या अथक परिश्रमानंतर राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश आला आहे.. कोल्हापूरकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
Share Now