कोल्हापूर – शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराजांविषयी खोल माहिती देऊन त्यांच्या जाणिवा समृद्ध करण्याचे काम शाहू छत्रपती फौंडेशन करीत आहे. ‘ राजर्षी’ ही दिनदर्शिका फौंडेशनच्या कार्याची प्रचिती आणून देणारी आहे, असे गौरवोद्गार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी काढले. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून न्यू पॅलेस येथे शाहू छत्रपती फौंडेशन तर्फे ‘राजर्षी’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.शाहू महाराज यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा झाला. शाहू छत्रपती फौंडेशनचे कार्याध्यक्ष जावेद मुल्ला , किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे ,डॉ राजेंद्र कांबळे, प्रा.डी.डी.पाटील, दीपक बिडकर, महेश धिंग, झाकीर पठाण, डॉ. बी.के.कांबळे,यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.सूत्रसंचालन राजर्षी दिनदर्शिकेचे समन्वयक नवाब शेख यांनी केले .यावेळी बोलताना श्रीमंत छत्रपती खासदार युवराज संभाजीराजे आणि श्रीमंत छत्रपती युवराज मालोजीराजे यांनी ‘राजर्षी’ दिनदर्शिका राज्यातील तमाम शाहूंप्रेमींच्या अभ्यासासाठी एक दस्तऐवज म्हणून उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
राजर्षी शाहूंच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचे कार्य शाहू छत्रपती फौंडेशन कडून-श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचे गौरवोद्गार

Read Time:1 Minute, 54 Second