पत्रकार दिनाच्या व्यथा
लेखक गायत्री सरला दिनेश घुगे (मुंबई)

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 19 Second

६ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकारांसाठी हा जणू एक सणचं असतो. आपल्या सर्वांची पत्रकारिता ज्या एका मूळ पुरुषामुळे उभी राहिली, त्या बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिनी हा दिवस साजरा केला जातो. पुढे ६ जानेवारी १८३२ मध्ये ‘दर्पण’ नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र जांभेकरांनी सुरू केले. मराठी पत्रकारितेचे संस्थापक बाळशास्त्री जांभेकर या महापुरुषाने वृत्तपत्र संपादित करून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. पुढे महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर… यांसारख्या अनेक व्यक्तींनी आपले विचार वृत्तपत्रांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवले. 

पुढे वृत्तपत्रांमध्ये अनेक बदल होत गेले. तसेच त्यांना इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेची देखील साथ लाभली. त्यासोबत आता डिजिटल पत्रकारिता देखील तितक्याच जोमाने सध्या सुरू आहे. माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. माध्यमांचं काम माहिती देणं, प्रशिक्षण, शिक्षण करणं, मनोरंजन करणं, प्रबोधन करणं  असते. सध्या अनेक पत्रकार हे वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. परंतु पत्रकारांना अनेक संकटांना नेहमीच सामोरे जावे लागत असते. 

नुकताच कोरोनासारखा महाभयंकर आजार आला होता हे  तर सर्वांना माहीत आहे. तसेच आता पुन्हा येत आहे. अशा देखील चर्चा होत आहेत. परंतु या सर्वांमध्ये फिल्डवर जाऊन प्रत्यक्ष अनेक पत्रकारांना काम करावे लागत होते आणि अजुनही काम करावे लागत आहे. त्यात अनेक पत्रकारांना कामावरून देखील काढण्यात आले. कोरोनाचा काळ हा महाभयंकर असा काळ होता. परंतु या काळामध्ये देखील अनेक पत्रकारांनी त्यांचे काम प्रामाणिकपणे बजावले आहे. 

        कोरोनाग्रस्त देशात रूग्णांना औषधोपचार करणाऱ्या हजारो नर्सेस, डॉक्टर्स व रुग्णालयात काम करणाऱ्यांना मृत्यूचा सामना करावा लागला. त्यांचे असंख्य मृत्यू झाले. आजही होत आहेत. तसेच अनेक पत्रकार देखील यामध्ये मृत्युमुखी झाले. मग त्यांचा मागे त्यांचा कुटुंबाचे काय होत असेल ? या सारखे अनेक प्रश्न उपस्थित होतात… पण या सर्व गोष्टीवर वर कोणी मार्ग काढत का? तसेच पत्रकारांसाठी कोणत्या क्षेत्रात कुठेही कोणत्याही प्रकारची स्कीम देखील उपलब्ध नसते. जे पत्रकार रात्रंदिवस कष्ट करून नागरिकांपर्यंत बातम्या पोहोचवतात त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रोटेक्शन उपलब्ध नसते… हे कितपत योग्य आहे?                                                                                                                                                          पत्रकार संबंधी सांगु तेवढ्या अडचणी या कमीच… पण अनेक लोक वरुन म्हणतात यांना काही काम धंदे नाही… पण लोकांना हे कळत नाही की पत्रकार आहेत म्हणून जगात काय चालू आहे? कुठे काय घडले ही इतंभुत माहिती नागरिकांपर्यंत पोहचते. असो…. या गोष्टीवर चर्चा करू ती कमीच… पण या सर्व गोष्टीवर मार्ग काढणे खूप जास्त गरजेचे आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *