कोल्हापूर/प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे विभाग कोल्हापूर यांच्यावतीने संविधान साक्षरता अभियान अंतर्गत सांविधानिक मुलभूत हक्क व कर्तव्ये या विषयावर आधारित प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास निर्मिती विचार मंचचे अनिल म्हमाणे, प्रा. डॉ. कपिल राजहंस यांचे मार्गदर्शन लाभले. आपल्या आयुष्यात संविधान किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी विशद केले.
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन बार्टीचे करवीर तालुका समता दूत आशा रावण यांनी केले. आभार कोल्हापूर बार्टीचे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रवीण कायंदे, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, कोल्हापूर समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, योजना प्रमुख उमेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.