Share Now
Read Time:1 Minute, 21 Second
Media Control News
देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर आता दिसू लागला आहे. आतापर्यंत दीड ते दोन लाखांमध्ये आढळून येणाऱ्या नवीन रुग्णांच्या संख्येने आज तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ही चिंता वाढवणारी बाब आहे. देशात गेल्या २४ तासांतील आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासांत ३ लाख १७ हजार ५३२ इतके नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ही गेल्या काही दिवसांतील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील करोनाच्या स्थितीबाबत आकडेवारी जाहीर केली आहे. देशात गेल्या २४ तासांत ३ लाख १७ हजारांवर करोनाचे नवीन रुग्ण आढळले असताना मृतांची संख्याही वाढत आहे. मृतांची संख्या ५०० च्या जवळ म्हणजे ४९१ वर पोहोचली आहे. दिलासा देणारीबाब म्हणजे गेल्या २४ तासांत २ लाख २३ हजार ९९० जण करोनामुक्त झाले आहेत.
Share Now