जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या डिजिटल डिस्प्लेचे उद्घाटन

कोल्हापूर/प्रतिनिधी: जिल्हा परिषदेला भेट देणाऱ्या अभ्यागतांना सर्व योजनांची माहिती मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या डिजिटल डिस्प्लेचे उद्घाटन आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, बांधकाम व आरोग्य सभापती वंदना जाधव, विशेष समितीचे सभापती, माजी अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

Advertisements

राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून आवास अभियान ग्रामीण २१- २२ अंतर्गत राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध घरकुल योजनांबाबत जनजागृती प्रचार व प्रसिद्धी करण्यात येते. डिजिटल डिस्प्ले /फलक चा वापर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध घरकुल योजना तसेच जिल्हा परिषदेमधील विविध विभागांच्या योजनांचा प्रचार व प्रसिद्धीसाठी हा डिस्प्ले /फलक जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेश दारामध्ये बसविण्यात आला आहे.

कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, गटनेता युवराज पाटील, विरोधी पक्ष नेते अरुण इंगवले व जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवींद्र शिवदास, कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 ——————– जाहिरात———————–

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *