Share Now
Read Time:1 Minute, 39 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२५ : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करुन स्वातंत्र्य लढ्यातील आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बोधचिन्ह स्टँडी तयार करण्यात आली असून बोधचिन्ह स्टँडीचे अनावरण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बोधचिन्ह स्टँडी अनावरण कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहूल रेखावार, कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास सहायक संचालक फारुक बागवान, माहिती अधिकारी, वृषाली पाटील, माहिती सहायक एकनाथ पोवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, माहिती कार्यालयातील कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.
Share Now