सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचा होणार खास गौरव…..
भारतीय लष्कराकडून परम विशिष्ट सेवा पदक दिले जाणार

Media Control News : गेल्या वर्षी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राचा मोठा सन्मान होणार आहे. उद्या (२६ जानेवारी) होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमात भालाफेकपटू नीरजला ४ राजपुताना रायफल्सकडून परम विशिष्ट सेवा पदक दिले जाणार आहे

ऑलिम्पिकच्या इतिहासात नीरज चोप्राने अशी कामगिरी केली जी आजवर कोणालाही करता आली नव्हती. अॅथलेटिक्समध्ये भारताला अद्याप एकही पदक जिंकता आले नव्हते. पण नीरजने पदकाचा हा दुष्काळ सुवर्णपदकासह भरून काढला होता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये निरजने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ इतक्या लांब भाला फेकून सुवर्णपदक जिंकले होते.

Advertisements

नीरजने आतापर्यंत पाच मोठ्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. यात आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ज्युनियर चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदकाचा समावेश आहे. परम विशिष्ट सेवा पदक हे भारतीय लष्करात एक सैन्य पुरस्कार आहे. हा पुरस्कार १९६० पासून दिला जातोय. शांतता किंवा सेवा क्षेत्रात करण्यात आलेल्या असाधारण कार्यासाठी हे पदक दिले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *