कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२५: राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त टाक (ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ कोल्हापूर) व हॉटेल मालक संघाच्या वतीने कोल्हापूर विमानतळ व रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले.
आतिथ्यशील परंपरेसाठी कोल्हापूरला ओळखले जाते. राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त प्रवाशांचे स्वागत करुन आपली संस्कृती सर्वदूर पसरवण्यास प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी केले होते. जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल मालक, चालकांनी या उपक्रमात सहभागी झाले.
राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त टाक ( ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ कोल्हापूर) संस्थेमार्फत विमानतळ, रेल्वे स्टेशन वर येणाऱ्या प्रवाशांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया, अध्यक्ष बळीराम वराडे, उपाध्यक्ष रवी पोतदार, उमेश पवार, विनोद कंबोज उपस्थित होते. हा उपक्रम दरवर्षी राष्ट्रीय पर्यटन दिनी राबविण्यात येणार असल्याची माहिती टाक संस्थेच्या वतीने देण्यात आली.
यावेळी सुरज नाईक, वैभव कुलकर्णी, मोसिन मुजावर, रोहन नायर, आशिष बुचडे, विश्वजीत सडोलीकर, आदित्य ठाकूर, सतीश दळवी उपस्थित होते.