जिल्ह्यात विविध ठिकाणी ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला…!

0 0

Share Now

Read Time:5 Minute, 0 Second

 कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२६ : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या शुभेच्छा.विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला कोल्हापूर जिल्हा उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे, जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील नागरीकांना शुभेच्छा दिल्या.

येथील छत्रपती शाहू स्टेडीयमवर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, अतिरीक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील उपस्थित स्वातंत्र्य सैनिक-कुटुंबियांना पालकमंत्र्यांनी गुलाब पुष्प देवून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली तसेच त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी महानगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहन:

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हाधिकरी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेत अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण:

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्रांगणात  जिल्हा परिषद अध्यक्ष  राहूल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास शिक्षण सभापती रसिका पाटील, समाज कल्याण सभापती कोमल मिसाळ, महिला व बालकल्याण सभापती शिवाणी भोसले, मुख्यकार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक रवी शिवदास यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये ध्वजारोहण:

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये उपविभागीय अधिकारी  सुशांत बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास सहकार न्यायालयाच्या न्यायाधीश अनुसया पाटील, स्वाती पाटील, राज्य गुप्त विभागाचे अपर उपायुक्त उमेश हजारे, मुख्य गुप्तवार्ता अधिकारी सचिन पाटील, नायब तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे यांच्यासह प्रशासकीय इमारतीतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *