जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा….!

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 22 Second

योगेश नागप गगनबावडा प्रतिनिधी: गगनबावडा आसळज या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त सरपंच कांबळे मॅडम तसेच ग्रामसेवक अरविंद तटकरे गावचे प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य गगनबावडा तालुकाध्यक्ष योगेश नागप हेही उपस्थित होते तसेच  रियाज रेटरेकर माध्यमिक विद्यालय असळज या ठिकाणचे सर्व शिक्षक विद्यार्थी यांनीही उपस्थिती लावली.

तसेच  कोल्हापूर सराफ व्यापारी संघ यांच्या तर्फे ध्वजारोहण करण्यात आले: कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे घाटी दरवाजा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त अध्यक्ष कुलदीप गायकवाड, उपाध्यक्ष जितेंद्र राठोड यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), रवींद्र राठोड, संचालक शिवाजी पाटील, ललित गांधी, प्रीतम ओसवाल, सुहास जाधव, प्रसाद कालेकर, तेजस धडाम, किशोर परमार, प्रशांत कारेकर यांच्यासह सभासद उपस्थित होते.

कोल्हापूर महापालिकेच्यावतीने ‎भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने आज कर्मवीर विठठल रामजी शिंदे चौकात महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

ध्वजारोहण कार्यक्रमापुर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका यांचे सामुहिक वाचन विजय वणकुंद्रे यांनी केले. यामध्ये आंम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरीकांस: सामाजिक, आर्थीक व राजनैतिक न्याय: विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य: दर्जाची व संधीची समानता निश्चीतपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करु अशी शपथ घेण्यात आली. तसेच माझी वसुंधरा अभियांना अंतर्गत हरीत कायद्याची प्रतिज्ञाही घेण्यात आली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त संदीप घार्गे, विनायक औंधकर, विद्यादेवी पोळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, नारायण भोसले, परवाना अधिक्षक राम काटकर, नगरसचिव सुनिल बिद्रे, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, पर्यावरण अभियंता समिर व्याघ्राबंरे, केएपसी कॉलेजचे प्राचार्य अरुन पोडमल, मुख्याध्यापिका सौ.अंजली जाधव, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनी, अग्निशमन दलाचे जवान, अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *