Share Now
Read Time:1 Minute, 12 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी: सादळे येथील प्रा. अजित एकनाथ पाटील हे सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्फत सप्टेंबर २०२१ मध्ये अधिव्याख्याता पदाकरता घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयातून उत्तीर्ण झाले. यापूर्वी ते इतिहास विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
तात्यासाहेब कोरे शिक्षण शास्त्र महाविद्यालय वारणा नगर येथे कार्यरत आहेत. त्यांना वारणा विभाग शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ आमदार विनय कोरे सावकर, प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. वासंती रासम, सी. ए. सुशांत फडणीस यांचे मार्गदर्शन लाभले. तात्यासाहेब कोरे शिक्षण शास्त्र महाविद्यालय चे समन्व्यक व्ही. बी. बुड्ढे यांचे सहकार्य लाभले.
Share Now