- मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतीं आहे समावेश; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची माहिती
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – राज्य निवडणूक आयोगाकडील दिनांक 20 मे 2019 रोजीच्या पत्रान्वये जुलै ते सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तसेच थेट निवडणुकीव्दारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदांसह रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांकरिता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे. त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील सार्वत्रिक 1 व पोटनिवडणुकीकरिता 65 ग्रामपंचायतींच्या 88 रिक्त सदस्य पदांचा कार्यक्रम घोषित केलेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील असे कार्यक्रमामध्ये नमूद केलेले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 14 ऑक्टोबर 2016 च्या आदेशानुसार आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी व आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही असे नमूद केलेले आहे.
- ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे. तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक – बुधवार दिनांक 22 मे 2019. नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ – शुक्रवार दिनांक 31 मे 2019 ते गुरूवार दिनांक 6 जून 2019 सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत (दिनांक 2 जून 2019 चा रविवार व दिनांक 5 जून 2019 ची सार्वजनिक सुट्टी वगळून).
नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ – शुक्रवार दिनांक 7 जून 2019 सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ – सोमवार दिनांक 10 जून 2019 दुपारी 3.00 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ – सोमवार दिनांक 10 जून 2019 दुपारी 3.00 वाजल्यानंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक – रविवार दिनांक 23 जून 2019 सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत. मतमोजणीचा दिनांक – सोमवार दिनांक 24 जून 2019. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक – गुरूवार दिनांक 27 जून 2019 पर्यंत.
- या निवडणूक कार्यक्रमानुसार विटा तालुक्यातील पळशी ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणूकीकरीता असलेल्या ग्रामपंचायती व कंसात रिक्त जागा पुढीलप्रमाणे – डोंगरवाडी (2), सांबरवाडी (3), खटकटवाडी (2), रसुलवाडी (2), शिपूर (1), बामणोली (1), निलजीबामणी (1), कावजी खोतवाडी (1), मालगाव (1), तुंग (1), हरोली (1), कदमवाडी (1), जाधवनगर (2), देवनगर (1), भेडवडे (बु.) (1), धोंडेवाडी (2), ढवळेश्वर (1), रामनगर (2), जोंधळखींडी (1), विसापूर (1), वासुंबे (1), कोणबगी (1), गोटेवाडी (1), कोणीकुर्ण (1), बोर्गी बुद्रक (1), ढाणेवाडी (1), रेणुशेवाडी (2), तुपेवाडी (ये) (1), उपाळेवांगी (1), वाजेगाव (1), नेर्ली (1), पुणदीवाडी (1), पुणदी (वा) (1), तावदरवाडी (1), बुरंगवाडी (1), बेलेवाडी (2), चिखलवाडी (1), चिंचेवाडी (1), खराळे (2), भैरववाडी (1), शिवरवाडी (1), धसवाडी (2), कुसळेवाडी (1), ढोलेवाडी (1), कदमवाडी (2), खुदलापूर (1), वाकाईवाडी (2), चरण (1), पाचगणी (2), मोरेवाडी (2), पावलेवाडी (1), लादेवाडी (1), प. त. वारूण (1), अस्वलेवाडी (2), शिंदेवाडी (2), बिळाशी (2), मराठेवाडी (2), डोंगरवाडी (2), फार्णेवाडी बी (2), भरतवाडी (2), माणिकवाडी (1), फार्णेवाडी शि (1), नायकलवाडी (1), गाताडवाडी (1) व येलूर (1).