दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ सामना बरोबरीत…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सीनियर गट साखळी फुटबॉल स्पर्धा २०२१-२२

आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ अ यांच्यात  खेळवला गेला पूर्ण वेळेत सामना १-१ बरोबरीत राहिला.

 सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघानी आक्रमक खेळावर भर दिला.

सामन्याच्या सुरुवातीला ऋषिकेश मेथे पाटील व प्रथमेश हेरेकर यांनी गोल करायची संधी गमावली .

पूर्वार्धात पाटाकडील कडून झालेल्या खोलवर चढाईत दिलबहार तालीम मंडळ चा गोलकीपर निखिल खाडे हा जखमी झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले. पुर्वार्धात दिलबहार तालीम मंडळ कडून झालेल्या चढाईत पाटाकडील तालीम मंडळाच्या बचाव फळीच्या नजरचुकीने स्वयंगोल झाला .

आणि सामन्यात चुरस वाढली. सामन्याच्या पूर्वार्धात दिलबहार ने १-०आघाडी घेतली.

     सामन्याच्या उत्तरार्धात पाटाकडील तालीम मंडळ कडून गोल बरोबरीत करण्यासाठी आक्रमक खेळावर भर दिला यामध्ये ऋषिकेश मेथे पाटील प्रथमेश हेरेकर ओमकार पाटील ओमकार जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला..

 तर दिलबहार तालीम मंडळ कडून बचावात्मक खेळावर भर दिला गेला.पाटाकडील चे खेळाडू अक्षय पायमल,प्रथमेश हेरेकर, रोहित पोवार यांनी गोल करायचा सोप्या संधी गमावल्या.

सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना पाटाकडील तालीम मंडळ कडून ओमकार जाधव च्या उत्कृष्ट पासवर ऋषिकेश मेथे पाटील याने हेड द्वारे अतिशय सुंदर गोलची नोंद करून सामना १-१ असा बरोबरीत आणला.

पूर्ण वेळेत सामना एक एक असा बरोबरीत राहिला

 सामन्यात दिलबहार कडून राहुल तळेकर जावेद मलबारी निखिल खाडे तसेच पाटाकडील तालीम मंडळ कडून ऋषिकेश मेथे पाटील, ओमकार पाटिल, ओमकार जाधव, रंजीत विचारे, अक्षय मेथे पाटील यांनी उत्कृष्ट खेळ करत सामना रोमहर्षक बनवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *