Kolhapur: जिल्ह्यात मतमोजणी दिवशी बंदी आदेश लागू

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 13 Second

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – मतमोजणी प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडली जाणे आवश्यक असल्याने तसेच मतमोजणी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्हा दंडाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये कोल्हापूर परिसरात दिनांक 23 मे 2019 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत जिल्ह्यात बंदी आदेश जारी करण्यात आला होता.

तथापि 47 – कोल्हापूर लोकसभा मतदार संघाकरीता होणाऱ्या मतमोजणीसाठी बहुउद्देशीय हॉल,शासकीय धान्य गोडावून समोर रमणमळा या नियोजित ठिकाणी जाणेकरीता रमणमळा पोस्ट ऑफिस चौक,पितळी गणपती चौक,विभागीय कृषी संशोधन केंद्र परिसर,रेणूका मंदिर चौक,कसबा बावडा कोल्हापूर या ठिकाणापासून पुढे जाणेसासाठी.

(भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व मतमोजणीसाठीच्या कामाशी निगडीत कर्मचारी,उमेदवार व त्यांचे नियुक्त केलेले मतमोजणी प्रतिनिधी वगळून) विभागीय कृषी संशोधन केंद्र परिसर,रेणूका मंदिर चौक, कसबा बावडा कोल्हापूर येथे भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे समर्थकांचे व्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षांच्या अगर अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना थांबणेसाठी.

पोस्ट ऑफिस,कसबा बावडा,कोल्हापूर व मेरी वेदर ग्राऊंड परीसरात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस युतीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचे समर्थकांचे व्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्ष्यांच्या अगर अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना थांबणेसाठी तसेच पितळी गणपती चौक परिसर येथे वंचीत बहुजन आघाडी व इतर पक्षाचे अगर अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्ते व्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षांच्या कार्यकर्त्यांना थांबणेसाठी. सदर दुरूस्ती आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम 188 प्रमाणे तसेच मतमोजणीसाठीच्या गोपनियतेचा भंग झालेस लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *