तुकाराम कदम,कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा उन्मेष नामक अश्वाचे बुधवारी 4 वाजता निधन झाले सकाळपासून अश्वला थकवा ,अशक्तपणा दिसून येत होता यासाठी देवस्थान समितीचे वेवस्थापक दीपक म्हेतर यांनी पशु वैदकीय डॉक्टराणा बोलावून तात्काळ त्याच्यावर उपचार सुरू केलें मात्र दुपारी चार च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने याअश्वाचे निधन झाले,
उन्मेष या नाथांच्या अश्वाला हिम्मत बहादूर चव्हाण सरकार यांच्याकडून सन दोन हजार बारा साली देण्यात आले होते यावेळी साधारण नऊ महिन्याचा हा अश्व होता आजअखेर दहा वर्षे नाथांच्या सेवेत घालवले होते .
निधनाचे वृत्त समजताच जोतिबा पुजारी ग्रामस्थ,भाविक यांच्यात हळहळ वेक्त झाली तसेच वृत्ताची बातमी झपाट्याने डोंगरपरिसरात पसरताच भाविक व नाथ भक्त यांनी डोंगरावर धाव घेतली, यानंतर ग्रामस्थ ,देवस्थान समितीकडून ट्रॅक्टर फुलांनी सजवण्यात आला .नाथांच्या अश्वला अंतिम दर्शनसाठी लोकांचा जनसमुदाय लोटला होता यानंतर मंदिरापरिसरात प्रदक्षिणा मारण्यासाठी अश्वला मंदिरात मार्गस्थ करण्यात आले यानंतर दक्षिण दरवाजा या ठिकाणी या अश्वाचे अंतविधी करण्यात आले.
घोड्याचे देखभाल करणारा कारागीर अशोक भोसले यांना अश्रू अनावर झाले होते.
यावेळी केदार्लिंग देवस्थान समितीचे कर्मचारी ,विश्वनाथ मेटके अतिश लादे ,पुजारी ,गावकर प्रतिनिधी,ग्रामस्थ, भक्त उपस्थित होते