मुंबई/प्रतिनिधी : क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन महान स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) यांचे निधन झालं आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न याचे शुक्रवारी वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलियन मीडियाला दिलेल्या निवेदनात पुष्टी केली आहे की, “शेन थायलंडमधील व्हिलामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर वैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. त्याला हृदयविकाराचा झटका (cardiac arrest) आला होता.”
दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सहवागने याबाबत ट्विट दुःख व्यक्त केलं आहे. त्याने लिहिलं आहे की, “विश्वासच बसत नाही. महान फिरकीपटूंपैकी एक, फिरकीला कूल बनवणारा, सुपरस्टार शेन वॉर्न राहिला नाही. जीवन खूप नाजूक आहे, परंतु हे समजणे फार कठीण आहे. त्याचं कुटुंब, मित्र आणि जगभरातील चाहत्यांसाठी माझ्या मनःपूर्वक संवेदना.”