कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक १० एप्रिलला : निवडणूक अधिकारी कांतिलाल ओसवाल यांची माहिती

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 28 Second

रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी,ता. १०:  सराफ व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक १० एप्रिलला होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी कांतिलाल गुलाबचंद ओसवाल (के.जी.) यांनी पत्रकार आज परिषदेत दिली.

ते म्हणाले, निवडणूक मंडळाच्या सदस्यांची बैठक होऊन त्यामध्ये दोन वर्षांसाठी (२०२२-२४) पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम ठरविण्यात आला. त्यानुसार सभासदांची कच्ची यादी ऑफिस बोर्डवर पाहणेकरिता रविवार, १३ मार्च, मतदार यादीसंबंधी तक्रार नोंदविणेची अखेरची तारीख बुधवार १६ मार्च, मतदारांची पक्की यादी ऑफिस बोर्डावर प्रसिद्ध शुक्रवार, १८ मार्च, उमेदवारी अर्ज देणेस सुरुवात रविवार, २० ते सोमवार २१ मार्च.

ते म्हणाले, उमेदवारी अर्ज स्वीकारणेस सोमवार, २१ ते २४ मार्च, उमेदवारी अर्ज छाननी शुक्रवार, २५ मार्च. उमेदवारी अर्ज मागे घेणेची अखेरची तारीख, सोमवार २८ मार्च, उमेदवारांची अंतिम यादी ऑफिस बोर्डावर पाहणेची तारीख, सोमवार २८ मार्चला मिळेल.

दरम्यान, रविवार, ता. १० एप्रिल रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन या कालावधीत मतदान होईल. मतदान संघाच्या डी. नं. १ महाद्वार रोड इमारत, चौथा मजला येथे होईल. सोमवार, ता. ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता मतमोजणी होऊन जादा विशेष सर्वसाधारण सभेत निवडणूक निकाल जाहीर केला जाईल. यावेळी निवडणूक मंडळाचे इतर सदस्य विजय शिवराम वशीकर, जवाहर केवलचंद गांधी, बिपीन नरेंद्रकुमार परमार, सुरेशराव शंकरराव गायकवाड, नंदकुमार भबुतमल ओसवाल, कांतिलाल असलाजी ओसवाल, उमेश अशोकराव जामसांडेकर व हेमंत महादेव पावसकर आदी उपस्थित होते.

घटनेतील बदलानुसार

अध्यक्षपदासाठी व उपाध्यक्षपदासाठी उमेदवाराची ३० वर्षे पूर्ण असावी. त्याचबरोबर कार्यकारी मंडळात दोन वर्षे सदस्य असावे. संचालक पदासाठी उमेदवाराची २० वर्षे पूर्ण असावी

प्रत्येक सभासदाला किमान दहा मते देण्याचा अधिकार. दहापेक्षा कमी मते दिल्यास मतपत्रिका अवैध ठरविण्यात येईल.

कार्यकारी मंडळाची रचना- अध्यक्षपदासाठी एक, उपाध्यक्ष पदाला एक व संचालक मंडळाला १२ अशी मते देण्याचा सभासदांना अधिकार. माजी अध्यक्ष स्वीकृत संचालक म्हणून पुढील दोन वर्षे काम पाहील.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *