चार राज्यातील भाजपाच्या घवघवीत यशाबद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने आनंदोत्सव

0 0

Share Now

Read Time:5 Minute, 28 Second

श्वेता पाटील कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.१०: आज उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश संपादन झाले. भाजपाच्या या घवघवीत यशाबद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला.

निकालाचा कौल स्पष्ट होताच दुपारी बिंदू चौक येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येत मोटरसायकल रॉली काढत माधुरी बेकरी, कॉमर्स कॉलेज, दिलबहार तालीम, टेंबे रोड, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक यामार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी पोचले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, जय श्री राम, देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, योगिजी आप आगे बढो – हम तुम्हारे साथ है, उत्तर प्रदेश की यही पुकार फिर एक बार भाजपा सरकार अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. हलगीच्या ठेक्यावर ताल धरत सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात हा विजय साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच प्रमुख नेत्यांनी साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

याप्रसंगी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, आज चार राज्यातील भारतीय जनता पार्टीला मिळालेला निकाल आनंददायी असून भारतीय जनता पार्टीच देशामध्ये बदल घडवू शकते. नरेंद्रजी मोदी यांनी २०१४ साली पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून लोकांना थेट फायदा देणाऱ्या अनेक योजना संपूर्ण गावपातळीवर पोचवण्याचे कार्य भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झाले आहे. जगाचे नेतृत्व करणारा कणखर नेता नरेंद्रजी मोदी हे असून आजचा विजय मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा असल्याचे नमूद केले.

याप्रसंगी बोलताना प्र.का.सदस्य महेश जाधव म्हणाले, जनतेने जातीय आणि धार्मिक समीकरणे पार करून भाजपला मत देत असल्याचं दिसून आले. केंद्र सरकारकडून करोना काळापासून नागरिकांना मोठ्या प्रमाणात धान्य, आवास योजना, किसान सम्मान निधी यासह अनेक योजनांचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे भाजपाच्या आजच्या विजयाचे श्रेय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांना जाते.यावेळी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, सत्यजित कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, अजित ठाणेकर, मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, भारती जोशी, किशोरी स्वामी, सुलभा मुजूमदार, गायत्री राउत, संजय सावंत, मंगला निप्पानीकर, कविता लाड, राधिका कुलकर्णी, समयश्री अय्यर, लता बरगे, प्राची कुलकर्णी, डॉ.राजवर्धन, दिनेश पसारे, अमर साठे, राजू मोरे, अमित टिकले, अशोक रामचंदानी, रहीम सनदी, अभी शिंदे, अमोल पालोजी, विजय खाडे-पाटील, विशाल शिराळकर, भैया शेटके, सुशांत पाटील, मामा कोळवणकर, प्रवीणचंद्र शिंदे, अशोक लोहार, निरंजन घाटगे, भरत काळे, रविंद्र वडगांवकर, महेश यादव, संजय जासूद, धीरज पाटील, भगवान काटे, अनिकेत मुतगी, सचिन सुतार, विवेक वोरा, अनिकेत सोलापुरे,गौरव सातपुते, नजीम आत्तार, आशिष कपडेकर, राहूल घाटगे, नितीन पाटील, सुमित पारखे, प्रीतम यादव, राजू बद्दी, दिलीप बोंद्रे, सुनीलसिंह चव्हाण, रणजीत जाधव, पृथ्वीराज जाधव, सुनील वाडकर, आसावरी जुगदार, सचिन साळोखे, राहूल भोसले यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *