Share Now
Read Time:1 Minute, 19 Second
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना भाजपच्या कांचन कुल यांनी मोठे आव्हान उभे केल्याचे निकालावरून दिसून येत आहे. अटीतटीच्या लढतीत सुळे यांना आतापर्यंत 15,042 मतांची आघाडी मिळाली आहे.
आतापर्यंत सुप्रिया सुळे यांना 1,55,779 मते मिळाली असून कांचन कुल यांना 1,40,737 मते मिळाल्याने त्या पिछाडीवर आहेत.
पवार घराण्याचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणारा बारामती मतदारसंघ स्वतःकडे टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला झगडावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
बारामतीत चमत्कार घडविण्याच्या जिद्दीने भाजप व मित्रपक्षाने बारामती मतदारसंघावर विशेष मेहनत घेतली होती. त्याचे परिणाम निकालांमध्ये प्रतिबिंबित होत आहेत.
Share Now