गोमटेशच्या विद्यार्थ्यांनी बनवली पक्षांची पाणपोई…!

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 45 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१६-

 निपाणी : गेल्या आठवड्यापासून निपाणी शहर व परिसरात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाचा पारा वाढत असताना उडत्या पाखरांना दाणा- पाणी ठेवण्याचा अनोखा उपक्रम बेळगाव गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी सुरु केला आहे. बालपणीच्या चिव चिव ये, दाणा,खा, पाणी पी ! असा जणू अनुभव शालेय विद्यार्थी घेत आहेत,हे विशेष. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पक्षांना उन्हाच्या तीव्रते पासून दूर राहण्यासाठी पाण्याची व्यवस्था झाली आहे. शाळेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्याचे पर्यावरणप्रेमी मधून कौतुक होत आहे.

गोमटेश शाळेचे विद्यार्थी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी उन्हाची तीव्रता वाढताच घरासमोरील झाडांवर, छतावर मातीचे परळ व वेगवेगळ्या भांड्यात चिमण्यांसाठी, पक्षांसाठी दाणा पाण्याची व्यवस्था केली आहे. उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे पाण्यासाठी पक्षी सर्वत्र भटकंती करतात. पक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये दया निर्माण व्हावी, म्हणून शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षकांच्या सहकार्याने घरासमोरील झाडावर पाखरांच्या दाणा पाण्याची व्यवस्था करण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. या उपक्रमात झाडांवर परळ आणि विविध मातीची भांडी बांधून दाणा- पाण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांनी केली आहे. रोज पक्षांसाठी दाणा- पाण्याची व्यवस्था हे विद्यार्थी करीत आहेत.

शाळेतील विद्यार्थी करण पटेल, समृद्धी मोळवाडे, परीनी पटेल, स्वप्नील पाटील, रितेश सावंत, अर्हम शहा, निर्जरा पाटील, प्रिती गोरवाडे, अदिती हलभावी, सोनाक्षी खोत, स्वरा कुंभार, पृथ्वीराज जाधव, नमन शहा, जान्हवी पाटील, निकीता खोत, नंदीनी खोत, आयुषी नेपीरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. त्यासाठी

प्राचार्या दिपाली जोशी, ज्योती हरदी,शिक्षीका वैशाली देशमाने शोभा इंगवले, सन्मती पाटील, नंदिनी पाटील, सुभाष इंगळे, प्राची शहा, भाग्यरेखा खटावकर, महानंदा बक्कनावर यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

‘मार्च महिन्याच्या प्रारंभापासूनच आणि परिसरात उन्हाळा वाढत असल्याने पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पाण्याची सुविधा करावी, असा उपक्रम संस्थेच्या उपाध्यक्षांनी आम्हाला दिला. मी पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीचा वापर केला असून त्यातून रोज चिमण्यासाठी पाणी टाकतो. चिमण्यासह इतर पक्षी त्यातून पाणी पितानाचा आनंद शब्दात सांगू शकत नाही.-‘समृद्धी मोळवाडे,

विद्यार्थिनी वर्षातील विविध ऋतूनुसार संस्थेतर्फे समाजाने पर्यावरणासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. त्यापैकीच एक उन्हाळ्यात पक्षासाठी पाणी आणि दाने ठेवण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांनी राबविला आहे. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.’-उदय पाटील,(उपाध्यक्ष,गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल, निपाणी)

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *