प्रॅक्टिसला नमवून पाटाकडील ची अव्वल स्थानावर झेप….

विशेष वृत्त अजय शिंगे-

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१६ : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सीनियर गट साखळी फुटबॉल स्पर्धा २०२१-२२

आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात खेळवला गेला हा सामना पाटाकडील तालीम मंडळ ने ३-२ अशा गोल फरकाने जिंकला.सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाटाकडील तालीम मंडळ व प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांनी आक्रमक खेळावर भर दिला.

पूर्वार्धात प्रॅक्टिस फुटबॉल क्लब कडून झालेल्या आक्रमक चढाईत सामन्याचा १६ व्या मिनिटाला प्रतीक बदामे याने गोल नोंदवत प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ला सामन्याच्या सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली . यानंतर पाटाकडील तालीम मंडळ कडून गोल ची परतफेड करण्यासाठी ऋषिकेश मेथे पाटील आणि प्रथमेश हेरेकर यांनी वारंवार प्रॅक्टिस च्या गोल पोस्ट वर अटॅक केले. पण गोल करण्यात यशस्वी झाले नाहीत. ऋषिकेश मेथे, प्रथमेश हेरेकर, यांनी गोल करायच्या संधी गमवल्या.पण सामन्याच्या ३६ व्या मिनिटाला मिळालेल्या संधीवर पटाकडील तालीम मंडळ चा खेळाडू अक्षय पायमाल गोल करत सामना१-१ असा बरोबरीत आणला.या गोल नंतर सामन्यात आक्रमक रंगत निर्माण झाली. पहिल्या हाफ मध्ये सामना १-१ ने बरोबरीत होता..

     सामन्याच्या उत्तरार्धात प्रॅक्टिस फुटबॉल क्लब कडून ४४ व्या मिनिटाला राहूल पाटील याने उत्कृष्ठ गोल करत सामना पुन्हा प्रॅक्टीस च्या बाजूने झुकवला.या गोल नंतर पाटाकाडील कडून आक्रमक हल्ले सुरू झाले .यातच सामन्याच्या ५१ व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नर किक वर ऋषीकेश मेथे याच्या उत्कृष्ठ पास वर अक्षय पायमल याने वैयक्तिक दुसऱ्या गोलची नोंद करत सामना पुन्हा बरोबरीत आणला. प्रॅक्टिस फुटबॉल क्लब व पाटाकडील तालीम मंडळ आक्रमक खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकत होते.सामना बरोबरीत सुटणार का अशी कुजबूज प्रेक्षक गॅलरीमध्ये सुरू असतानाच.

सामन्याच्या ७२ व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटील याच्या उत्कृष्ट पासवर प्रथमेश हेरेकर याने गोल नोंदवत. सामन्याचे चित्र पलटावले.हा गोल विजयी गोल ठरला..

आणि सामना पाटाकडील तालीम मंडळ ने जिंकला.सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ कडून ऋषिकेश मेथे पाटील,यश देवणे, अक्षय पायमल तर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब कडून राहुल पाटील, ओमकार मोरे, कैलास पाटील,यांच्या कडून उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन झाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *