Share Now
Media Control Online
आयपीएलच्या पंधराव्या मोसमाची सुरुवात शनिवारपासून वानखेडे स्टेडियमवर होत असून पहिला सामना गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाईल. सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. दोन्ही संघांनी गेल्या हंगामात अप्रतिम प्रदर्शन केले होते. कोलकाता नाईट रायडर्सने तर अंतिम फेरीत झेप घेतली होती. मात्र, चेन्नईने त्यांना पराभूत करून चौथ्यांदा आयपीएलचे अजिंक्यपद पटकावले होते. आता हे गतविजेते आणि उपविजेते पहिल्याच सामन्यात आमने-सामने येत आहेत. त्यात बाजी कोण मारणार याचे कुतूहल रसिकांना लागून राहिले आहे. कोलकाता आणि चेन्नई या दोन्ही संघांकडे नवीन कर्णधार आहेत. केकेआरचे नेतृत्व श्रेयस अय्यर आणि सीएसकेच नेतृत्व रवींद्र जडेजा करतोय. केकेआरने श्रेयस अय्यरकडे कप्तानपद सोपवले आहे तर महेंद्रसिंग धोनीने रवींद्र जडेजाला संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.
Share Now