Share Now
Read Time:1 Minute, 12 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. ८ : सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हा जात प्रमाणपत्र समिती कार्यालयामध्ये ४ एप्रिल पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले यांनी दिली आहे.
११ वी उत्तीर्ण होऊन १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेत असलेले विद्यार्थी, पदविका व्दितीय वर्षातून तृतीय वर्षात प्रवेश घेत असलेले विद्यार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशाकरिता चालू वर्षाची सीईटी परीक्षा देत असलेले विद्यार्थी यांना परिपूर्ण अर्ज व त्रुटी पुर्तता/ पुरेसे पुरावे सादर करण्याबाबत समिती कार्यालयामार्फत आवाहन करण्यात आले आहे.
Share Now