Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी : २०२६ सालापर्यंत कोल्हापूर हे पुण्यानंतर राज्यातील सर्वात मोठे विकसित शहर असेल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला व्हायब्रंट महा एक्सपो २०२२ च्या शाहूपुरी जिमखाना मैदानावर झालेल्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.उद्योग क्षेत्राला चालना मिळावी व वेगवेगळ्या उद्योगांची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँन्ड इंडस्ट्री अँन्ड अँग्रीकल्चर व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँन्ड इंडस्ट्रीज व एमआयडीसी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने हे भव्य औद्योगिक आणि यंत्रसामग्री असणारे ” व्हायब्रंट महाएक्सपो २०२२” प्रदर्शन १५ ते १८ एप्रिल या कालावधीत शाहूपुरी जिमखाना मैदान येथे आयोजित केले आहे.या प्रदर्शनाचे आज फित कापून उदघाटन पालकमंत्री सतेज पाटील व खा.संजय मंडलिक व खा.धैर्यशील माने यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर खा.धैर्यशील माने,खा.संजय मंडलिक यांची तर
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे,एम. आय.डी.सीचे विभागीय अधिकारी राहुल भिंगारे,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष रवींद्र माणगावे,करुणाकर शेट्टी,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर,रिलायन्स इंडस्ट्रीज लि. पुणेचे सत्यजित भोसले, रामसा क्रेन्स प्रा. लि. चे सीईओ सदाशिव बरगे, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष रवी बोराटकर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले अर्थकारणाची चक्रे फिरत आहेत नव्या टेक्नॉलॉजी माहिती होण्यासाठी नवीन उद्योजकांना हे प्रदर्शन माध्यम आहे कोल्हापूर मध्ये पूर्वी एमआयडीसी ची संकल्पना नव्हती उद्यम को – ऑप सोसायटी होती याठिकाणी उद्योजकांना उभे केले गेले आता मात्र उद्योग धंदे वाढीला लागले आहेत जमिनीची कमतरता आहे अशी २७० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. करवीर तालुक्यातील हलसवडे येथे एमआयडीसी करण्याचा विचार चालू आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये औद्योगिक प्रगती होणे आवश्यक आहे केवळ शेती आणि दूध यावरच अर्थकारण चालते त्यामुळे उद्योग क्षेत्राला चालना देणे गरजेचे आहे असे सांगितले. कोल्हापूरला पुढे घेऊन जाण्याचा विचार चालू आहे त्यासाठी अनेक रस्त्यांचा प्लान तयार केलेला आहे नाईट लँडिंग विमानतळावर करण्याची तयारी चालू आहे कोल्हापूर मधील किचन वेअर कपड्यांचे मार्केट यांच्या विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे मेट्रोच्या माध्यमातून पुणे मुंबई पुढे येत आहे यामुळे पश्चिम महाराष्ट्राला मूलभूत सुविधा कशा देता येतील यासाठी प्रयत्न चालू आहेत कोल्हापूरच्या विमान तळाच्या ठिकाणी सांगली सातारा वरून लोकांना येण्याची संधी आहे या ठिकाणी वैयक्तिक विमानतळ होऊ शकत नाही त्या दृष्टीने ही प्रयत्न चर्चा चालू आहेत देशात व राज्यात ३० जिल्हे एक्सपोर्ट मध्ये समाविष्ट आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश सातव्या क्रमांकावर आहे कनेक्टिविटी साठी प्रयत्न केला गेला पाहिजे निधी कशा पद्धतीने कोल्हापूरकडे येता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे सांगून २०२६ सालापर्यंत कोल्हापूर कोकणसाठी व पश्चिम महाराष्ट्रसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे अनेक रस्ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत सातारा कोल्हापूर रस्ता काम होणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे त्याला लवकरच गडकरी यांच्यांकडून मंजुरी मिळेल असे सांगितले.त्यामुळे कोल्हापूर विकासाच्या बाबतीत नावारूपाला येईल त्यासाठी आपल्या सर्वांची तयारी असली पाहिजे चंद्रकांत जाधव यांनी यासाठी डीपीआर तयार केला होता त्यामुळेच विकासाच्या दृष्टीने कोल्हापूरला पुढे घेऊन जायचे असेल तर सर्वांनी एकत्रित येऊन चर्चा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अनेक हॉस्पिटल चे ठिकाणी बाहेरून रुग्ण येत आहेत त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय करण्याच्या दृष्टीने ही पावले टाकली जात आहेत डेस्टिनेशन कोल्हापूरच्या माध्यमातून प्रयत्न केला पाहिजे खेळाबाबत विचार केला पाहिजे आपल्या कोल्हापूर शहर बाबत कोणीही वाईट न बोलता सर्वांनी चांगले शहर असेच बोलावे.विकासासाठी सर्वांनी एकत्र बसून महिन्यातून एकदा बसून चर्चा करूया अशी अपेक्षा व्यक्त केली. तिसरी पिढी आपल्याला सांभाळावी लागणार आहे. कोल्हापूरमध्ये बदल करणे आवश्यक आहे अन्यथा पेन्शनरांचे शहर म्हणून कोल्हापूरची ओळख होईल.असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी औद्योगिक गती वाढविण्यासाठी हे प्रदर्शन भरविले गेले आहे वेळेची वाट न पाहता दिशा देण्याच्या दृष्टीने कोल्हापूरमध्ये पावले टाकने आवश्यक आहे.शाहू महाराजांनी राधानगरीच्या धरणाच्या माध्यमातून पिण्यास पाणी उपलब्ध केले तशी उद्योगांमध्ये दूरदृष्टी कशी आणायची हे आपण यातून शिकले पाहिजे. सरकारचे सहकार्य असल्याशिवाय कोणत्याही गोष्टी साध्य होत नाहीत त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. प्रदर्शन भरविण्यासाठी एकच ठिकाण कोल्हापूरमध्ये उपलब्ध झाले तर सर्वांना त्याचा फायदा होऊ शकतो असे सांगून इचलकरंजी वस्त्रोद्योग नगरी कोल्हापुरी चप्पल गांधीनगरचे मार्केट उद्यम नगरी की जगभरात पोहोचविण्यासाठी एकाच बॅनरखाली आणणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे असे सांगून कोल्हापूरच्या दृष्टीने उद्योजक आणि पर्यटक महत्त्वाचा आहे या वाढीसाठी आपण पावले टाकूया व विकासाला कनेक्टिविटी महत्त्वाची आहे कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने आपण लोकप्रतिनिधीं म्हणूम केंद्र पातळीवर प्रयत्न करूया असेही बोलून दाखवले.
यावेळी बोलताना खासदार संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांनी उद्योगधंदा यास प्राधान्य दिले केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही आमच्या खासदारकीच्या माध्यमातून अनेकदा प्रश्न मांडले आहेत व्यापारी व उद्योजकांचे प्रश्न सोडवावे यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो ललित गांधीजी त्या दृष्टीने प्रयत्नशील असतात एक लोकप्रतिनिधी म्हणून २०२४ पर्यंत या समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरच्या विकासासाठी एक रोडमॅप केला जाणार असल्याचे असे आश्वासन दिले.उद्योग वाढीबरोबर कामगारांसाठी काय करता येईल याबाबत विचार करणे आवश्यक आहे. तरुण पिढी पुढे आली आहे जागतिक पातळीवर कोल्हापूरचे नाव कसे पोहोचेल व तशा पद्धतीचे उत्पादन कसे घेता येईल यासाठी उद्योग क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा कशा राबवाव्यात यासाठी काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
रिलायन्स इंडस्ट्रीज लि. पुणेचे
सत्यजित भोसले यांनी पुण्यात अँटोपल्सचा कायमचा एक हॉल आहे तशा पद्धतीने एक कायमचा हॉल कोल्हापूरसाठी केला गेला पाहिजे त्या ठिकाणी एकत्रित प्रदर्शने भरविली जाऊ शकतात असे निदर्शनास आणले.
महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष रवी बोराडकर यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून उद्योजकांना आपले उत्पादन समोर आणण्याची संधी मिळते.उद्योजकांच्या समस्या व अडचणी असा एक अभ्यास करायला आम्ही तयार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर यांनी औद्योगिक विकास हा कमी पडत आहे.सिंधुदुर्ग पाठोपाठ कोल्हापूरला पर्यटनमध्ये पुढे आणण्याचा विचार चालू आहे. आम्ही नेहमीच महाराष्ट्र चेंबर सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले.
यावेळी स्वागत पर भाषणात बोलताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँन्ड इंडस्ट्री अँन्ड अँग्रीकलचरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन असून पन्नास हजाराच्या आसपास लोक या प्रदर्शनाला भेट देत असतात या प्रदर्शनाची माहिती घेऊन विकासाला चालना मिळू शकते कोल्हापूर मध्ये विमान लँडिंग रात्रीच्या वेळी सुरू झाले तर औद्योगीकरणाला चांगली दिशा मिळणार आहे व नवे पर्व ठरणार आहे नवनवीन उद्योग धंदे हेल्थ टुरिझम व्हावे यादृष्टीने पावले टाकले गरजेचे आहे तरुणांना व उद्योजकांना मार्गदर्शन या प्रदर्शनाच्या माध्यमातून केले जाणार आहे डिजिटल चा उपयोग करून व्यापार कसा विकसित करता येईल नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा होईल याची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे असे सांगितले.व पालकमंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कोल्हापूरसाठी नेहमीच कार्यरत राहू असे आश्वासन दिले.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यानी बोलताना उदयोग क्षेत्राला चालना व गती मिळावी यासाठी स्वर्गीय उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी प्रदर्शनासाठी पुढाकार घेतला होता उद्योजकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्श व्हावे हाच या प्रदर्शनाचा उद्देश आहे आम्ही सर्व संघटना एकत्रित येऊन महिन्यातून एक दिवस व्यापार व उद्योगांसाठी देणार असल्याचा शब्द शेटे यांनी यावेळी दिला.
रामसा क्रेन्स प्रा. लि. चे सीईओ सदाशिव बरगे यांनी बोलताना कोल्हापूर व सांगली चा विकास होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.हे आयोजित प्रदर्शन उद्योग क्षेत्रासाठी व उद्योजकांना विचार करायला लावणारे आहे. नवनवीन तंत्रज्ञान अवलंबले तर विकास व्हायला वेळ लागणार नाही असे सांगितले.यावेळी हाऊस ऑफ इव्हेंटचे सुजित चव्हाण यांना लातूर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाची इव्हेंटची जबाबदारी मिळाल्याने त्यांचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सुत्रसंचालन ताज मुलाणी यांनी केले तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे करुणाकर शेट्टी यांनी आभार मानले.