मान्सून पुर्व तयारीचा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडून आढावा….!

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 39 Second

कोल्हापूर/प्रतिनधी  : मान्सून 2022 आणि संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या पुर्वतयारीचा आढावा बुधवारी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी घेतला. आयुक्त कार्यालयात संबंधीत अधिकारी यांची बैठक झाली.अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी आपत्ती व्यवस्थापनेबाबतचा विभागावाईज माहिती सादर करण्याच्या सुचना दिल्या. यानंतर आरोग्य, पवडी, अग्निशमन, आरोग्य व उद्यान या विभागांनी सुरु केलेल्या पुर्वतयारीची माहिती दिली.

            प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी नाले सफाई उप-आयुक्त, सहा.आयुक्त व उपशहर अभियंता यांनी विभागीय कार्यालय अंतर्गत नाल्यांची व चॅनेलची सफाई पुर्ण झाली का याची खात्री करावी. तसे प्रमाणपत्र आरोग्याला द्यावे. ओढयामधील किती गाळ उठाव झाला. सदरचा गाळ कोठे टाकला जातो याची व्हिजीटद्वारे तपासणी करावी. धोकादायक इमारतीवर काय कारवाई केली, किती इमारती उतरवल्या, स्टक्चरल ऑडिट किती इमारतींचे केले, किती दुरुस्त केल्या याची माहिती पुढील बैठकीपुर्वी देण्याच्या सुचना उपशहर अभियंता यांना दिल्या. पूर बाधीत क्षेत्रातील नागरीकांना कोरोनाचे नियम पाळून स्थलांतरीत करण्याचे नियोजन करा. शहरातील धोकादायक झाडे, पोल पावसाळयापुर्वी उतरवून घेण्याची दक्षता उद्यान व विद्युत विभागाने घ्यावी. पूर बाधीत क्षेत्रातील वाहने पार्किंग करणेसाठी व जनावरे ठेवण्यासाठी विभागीय कार्यालयांनी आपल्या क्षेत्रातील ओपन स्पेसवर मागील वर्षी प्रमाणे नियोजन करावे. मागील वर्षी 56.2 पुराची पातळी झालेने ज्या ज्या ठिकाणी पुराचे पाणी आले अशा भागांची यादी तयार करुन नागरीकांना स्थलांतरीत करण्याचे नियोजन करा. महापालिकेबरोबरच आवश्यकता भासल्यास खाजगी बोटी, बोटी चालक यांची फोन नंबरसह यादी तयार करण्याच्या सुचना मुख्य अग्निशमन अधिकारी यांना दिल्या. पूर बाधीत क्षेत्रातील ज्या ज्या अपार्टमेंट धारकांना बोटीबाबत नोटीसा दिलेल्या आहेत. त्यांच्यावर पुढे काय कारवाई केली याबाबतचा दहा दिवसात सहा.संचालक नगररचना व मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या. पूर बाधीत क्षेत्रामधील नागरीकांना पब्लिक अनाऊसमेंट सिस्टीमद्वारे सुचना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय ठेवण्यासाठी समन्वय अधिकारी नेमण्याच्या सुचना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना दिल्या. संभाव्य पूर परिस्थीतीमध्ये औषधांची, टँकरची व इतर अनुषंगीक साहित्य लागते ते घेण्यासाठी निविदा प्रक्रिया पावसाळयापुर्वी पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

            यावेळी सहा.आयुक्त विनायक औंधकर, उपजल अभियंता रावसाहेब चव्हाण, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रणजित चिले, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, हर्षजीत घाटगे, बाबूराव दबडे, विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, किटक नाशक अधिकारी स्वप्निल उलपे आदी उपस्थित होते.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *