कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी निमित्त महापालिकेच्यावतीने शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, मार्केट परिसर, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक स्थळे व स्मारक परिसर या ठिकाणांची स्वच्छता करण्यात येत आहे. हि स्वच्छता मोहिम मंगळवार, दि.१९ ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत हबक पध्दतीने कर्मचारी लावुन करण्यात येत आहे. या स्वच्छतेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणेसाठी उप-आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, विद्यादेवी पोळ, मुख्य लेखापाल संजय सरनाईक व शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांची नियत्रंण अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अधिनस्त आरोग्य निरिक्षक यांनी आपले प्रभागातील सर्व मुख्य रस्त्यांची, सार्वजनिक ठिकाणांची, मार्केट परिसर, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक स्थळे व स्मारक परिसर स्वच्छता करण्यात येत आहे.
हि मोहिम मंगळवारपासून सुरु झाली असून यादिवशी खानविलकर पेट्रोल पंप ते सर्किट हाऊस, खानविलकर पंप ते भगवा चौक, कावळा नाका ते मार्केट यार्ड, कळंबा झेल ते इंदिरा सागर हॉटेल, सीपीआर चौक ते दसरा चौक विल्सन पूल, सीपीआर चौक ते खानविलकर पेट्रोल पंप, जावळाचा गणपती ते फुलेवाडी मेनरोड, शिवाजी विद्यापीठ ते मिल्ट्री कॅम्प ते केएसबीपी चौक, रंकाळा परिसर मेनरोड, कळंबा फिल्टर हाऊस ते कळंबा नाका ते चिवा बाजार चौक, तलवार चौक ते नविन वाशी नाका या परिसरात स्वच्छता करण्यात आली. बुधवारी कावळा नाका ते व्हिनस कॉर्नर, डी एस पी चौक ते पितळी गणपती ते रमनमळा, मार्केट यार्ड ते तावडे हॉटेल, इंदिरा सागर हॉटेल ते शेंडा पार्क, गंगावेश ते पंचगंगा घाट, सायबर चौक ते शेंडापार्क, कळंबा फिल्टर हाऊस ते तलवार चौक, चिवा बाजार ते फुलेवाडी रिंगरोड या परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.
गुरुवार, दि.२१ एप्रिल २०२२ रोजी भगवा चौक ते धैर्यप्रसाद चौक ते पितळी गणपती, भगवा चौक ते शिये नाका, कावळा नाका ते मिल्ट्री कॅम्प, हॉकी स्टेडिअम ते गोखले कॉलेज, शाहू मिल ते सायबर चौक, तलवार चौक ते शालिनी पॅलेस रोड येथे राबविण्यात येणार आहे