राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त छत्रपती शाहू मिल येथे स्वच्छता….!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 10 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी ता. २१ : राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कार्यक्रमानिमित्त महापालिकेच्यावतीने छत्रपती शाहू मिल येथे गेले १९ दिवसापासून महापालिकेच्यावतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. छत्रपती शाहु मिल हि बरेच वर्षापासुन बंद अवस्थेत असलेने याठिकाणी व्यापक प्रमाणात स्वच्छता करणे गरजेचे होते. यासाठी दिनांक एप्रिल २०२२ पासुन स्वच्छतेला सुरूवात करण्यात आली. हि स्वच्छता महानगरपालिका आरोग्य विभाग, बांधकाम व उद्यान विभाग यांचेमार्फत करण्यात आली. छत्रपती शाहुमिल बंद अवस्थेत असलेने याठिकाणी मोठया प्रमाणात झाडे झुडपे, तणकट वाढलेले होते. छत्रपती शाहू मिल व परिसरात स्वच्छता करणेकरीता महानगरपालिकेबरोबरच विविध स्वयंसेवी संस्था यांनी सहभाग घेतला होता. या स्वच्छतेमध्ये छत्रपती  शाहू मिल व परिसर स्वच्छता करणे, तणकट काढणे, कचरा उठाव करणे, पाण्याच्या टँकरव्दारे फायरिंग करणे, ग्रासकटिंग करणे, इत्यादी स्वरूपाची कामे करण्यात आलेली आहेत. उद्यान विभागामार्फत वृक्षाचे फांदया कटींग करणे, बांधकाम विभागामार्फत खरमाती उठाव करणे, रोलींग करणे, बॅराकेटींग करणेचे कामकाज करण्यात आले आहे. स्वच्छतेसाठी दैनंदिन आरोग्य विभागाचे १००  हुन अधिक कर्मचारी, ४  जेसीबी मशिन, ४ डंपर, फायरटँकरव्दारे फायरिंग करणे, कटींग उठाव करणे इत्यादी स्वरूपाचे कामे करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर विभागीय कार्यालयाच्यावतीने या परिसरात पार्किंगची व्यवस्था व आरोग्य विभागाच्यावतीने वैद्यकिय पथक नेमण्यात आले आहे.   

 

हि मोहिम प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, अति-आयुक्त नितिन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसुळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली, उपशहर अभियंता बाबूराव दबडे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार,  सहा.अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता पदमल पाटील, सर्व्हेअर तानाजी गेजगे आरोग्य विभागाचे आरोग्य निरिक्षक श्रीराज होळकर, सुशांत कावडे व व विभागीय कार्यालयाचे, आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *