Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी : काळम्मावाडी थेट पाईप लाईन योजनेचे काम प्रगतीपथावर असून या योजनेचे काम ८५ टक्के पुर्ण झाले आहे. पुईखडी येथे जल शुध्दीकरणाचे काम १०० टक्के पुर्ण झाले असून याठिकाणी स्काडा यंत्रणाही कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. पुईखडी येथील जल शुध्दीकरण केंद्राची चाचणी पुर्ण करण्यात आली आहे. मे महिन्यात हे केंद्र कार्यान्वीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काळम्मावाडीच्या एकूण ५२.९७० किलो मिटर पाईपलाईन पैकी ५२.०० किलोमिटरचे काम आजअखेर पुर्ण झाले आहे. उर्वरीत काम प्रगतीपथावर आहे. पाईपलाईन टाकण्यात आलेल्या कामापैकी एकूण ४६ किलोमिटर पाईपलाईनचे हायड्रॉलिक टेस्टिंग करण्यात आलेले आहे. उर्वरीत हायड्रॉलिक टेस्टिंगचे काम काम सुरु आहे. काळम्मावाडी धरणबुडीत क्षेत्रामधील Twin जॅकवेलचे काम सुरु असून सदरचे काम मे अखेर पुर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे. बीपीटी टँकचे कामही ९५टक्के पुर्ण झाले असून सदर कामापैकी ग्राऊटिंग, गिलावा व पायरी टप्याचे कामही प्रगतीपथावर आहे. योजनेच्या एकूण कामापैकी ३३.६० टक्के कामाचे थर्ड पार्टी ऑडिट हे महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे (COEP) यांच्यामार्फत करण्यात आले आहे. सदर कामाची दर्जा व गुणवत्ता हि विहित मानंकनाप्रमाणे असलेचे त्यांनी प्रमाणित केले आहे. उर्वरीत कामाचेही ऑडिट करण्याबाबत पत्रव्यवहार संस्थेशी करण्यात आला आहे. सदरचे ऑडिट लवकरच पुर्ण करुन घेण्यात येणार आहे.
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेमधील व्हॉल्व बसविण्याचे व ब्रिद्री सब स्टेशनपासून हेडवर्कस पर्यंत विद्युत वाहिनीचे कामही प्रगतीपथावर आहे. याचे उर्वरीत कामे मे अखेर पुर्ण करण्याचे नियेाजन करण्यात आले आहे. या योजनेचे उर्वरीत काम ३१मे पर्यंत पुर्ण करण्याच्या दृष्टीने सूक्ष्म नियेाजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे ३१ मे पर्यंत विहित मुदतीत कामे पुर्ण करुन ट्रायल व टेस्टींग करण्यात येणार आहे. यानंतर हि संपूर्ण योजना पुर्ण क्षमतेने कार्यान्वीन करण्यात येणार आहे. असे नियोजन करण्यात आले आहे.