गुजरी सुवर्ण जत्रेचा ग्राहक, पर्यटकांनी लाभ घ्यावा सराफ व्यापारी संघातर्फे राठोड, हावळ यांचे आवाहन

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 7 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती-शताब्दीनिमित्त आयोजित २२ ते २४ एप्रिल या कालावधीत गुजरी सुवर्ण जत्रेचा ग्राहक, पर्यटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गुजरी सुवर्ण जत्रा समितीतर्फे  कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड व उपाध्यक्ष विजय हावळ यांनी आज केले.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व समारंभात जिल्हा प्रशासनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी गुजरी वसवली. त्यामुळे हा महोत्सव गुजरीत आयोजित केला जात आहे. कालांतराने शहर वाढले आणि इतर ठिकाणीही सराफ व्यवसाय चालू झाला. हा महोत्सव म्हणजे शाहू महाराजांना अभिवादन आहे. समितीतर्फे शाहू महाराजांनी जिल्ह्यात केलेल्या कार्याचा ठसा गुजरी येथे कमान, बॅनरच्या माध्यमातून प्रतिकात्मक स्वरूपात उमटवला जाणार आहे.  

या कार्यक्रमात शुक्रवार, ता. २२ ते २४ एप्रिल २०२२ रोजी गुजरी सुवर्ण जत्रा आयोजित केली आहे. गुजरी सुवर्ण जत्रा समितीतर्फे आयोजित या जत्रेमध्ये सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत सराफी दुकाने सुरू असतील. यामध्ये पारंपरिक साज, ठुशी, बुगडी, टीक, राणीहार, चिताक, शिंदेशाही तोडे अशा दागिन्यांबरोबरच देशभरातील सोने-चांदीचे दागिने  खरेदीची ग्राहकाला पर्वणी आहे. मजुरीमध्ये भरघोस सूटही असणार आहे. गुजरी सुवर्ण जत्रा म्हणजे ग्राहक, पर्यटकांच्या स्वागतासाठी येथे अक्षरशः जत्राच असणार आहे. प्रत्येक दुकान दिवाळीप्रमाणे सजलेले असेल.  लक्ष वेधणारी, आकर्षक रांगोळी प्रत्येक दुकानासमोर असेल. यावेळी सचिव प्रीतम ओसवाल, तेजस धडाम आदी उपस्थित होते.     

ग्राहक देवो भव!

आकर्षक रांगोळी, पाणपोई, सरबत आदीची सोय. तीन दिवसांत वाहतूक बंद. मान्यवर, सेलिब्रिटींची जत्रेला भेट.

तीन दिवस गुजरी परिसरात खाऊ गल्लीचे आयोजन.

गिफ्ट, डिस्काऊंट कूपन

शाहू महाराजांच्या १०० व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रोज १०० ग्राहकांना गिफ्ट मिळेलच शिवाय खरेदीवर डिस्काऊंट कूपनही मिळेल 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *