कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणात अटक केलेल्या गुणरत्न सदावर्ते यांचा मुंबई सातारा पटपट कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी दुपारी ऑर्थर रोड कारागृहातून ताबा घेतला
त्यांना रात्री उशीरा कोल्हापुरात आणण्यात आले. सदावर्ते यांना अटक दाखवून आज गुरुवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान आक्षेपार्ह विधानामुळे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात सकल मराठा मोर्चाचे समन्वयक, दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देऊन गुन्हा नोंदवला होता सदावर्ते यांना मराठा आरक्षण निवेदन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी अनेक ठिकाणाहून पैसे जमा केले होते त्याचा त्यांनी दिलेला नाही त्यामुळे त्याचे सर्व आर्थिक व्यवहारांच्या चौकशीची मागणी पाटील यांनी पोलिसांनी केली होती त्याबाबत सदावर्ते यांना अटकपूर्व जामीन मिळावा साठी कोल्हापूर जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. पण सरकारी पक्षाला कागदपत्रे मिळत नसल्याने त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर होऊ शकले नाही गुरुवारी होत आहे.