कोल्हापूर/प्रतिनिधी : सुवर्ण कारागीर व सराफ व्यावसायिकांच्या वृद्धीसाठी यापुढेही असे विविध उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी आज केले गुजरी येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व समारंभात जिल्हा प्रशासनाच्या व गुजरी सुवर्ण जत्रा समितीच्या वतीने आयोजित सुवर्ण जत्रेच्या सांगता समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ते म्हणाले, गेल्या तीन दिवसांमध्ये गुजरीमध्ये ग्राहकांच्या उत्साहात आणि मोठ्या उलाढालीमध्ये सुवर्ण जत्रा पार पडली. याला सुवर्ण कारागीर व सराफ व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी पारंपारिक साज, ठुशी, बुगडी, टीक, राणीहार, चिताक, शिंदेशाही तोडे अशा दागिन्यांबरोबरच देशभरातील सोने-चांदीच्या दागिन्यांची विक्री झाली. काही दुकानांमध्ये मजुरीवर मोठी सूट दिल्याने प्रत्येक व्यावसायिकाची चांगली विक्री झाली. त्याचबरोबर पुन्हा पारंपरिक दागिन्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे यापुढेही अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस आहे.सुवर्ण जत्रेसाठी सहयोग करणारे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे, जिल्हा प्रशासनाबरोबर माध्यम प्रतिनिधींचेही मी आभार मानतो.
उपाध्यक्ष विजय हावळ यांनी स्वागत केले. सचिव प्रीतम ओसवाल यांनी प्रास्ताविक केले. यावेळी दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंगचे सचिव श्रीराम भुरके, संभवनाथ जैन श्वेतांबर संघाचे रतन गुंदेशा, श्री चंद्रप्रभू जैन बस्तीचे गोटू वणकुद्रे, पांचाल सोनार समाजाचे अध्यक्ष अनिल पोतदार (हुपरीकर), कोल्हापूर सुवर्णकारचे नंदू बेलवलकर, सोने-चांदी बहुउद्देशीयचे नचिकेत भुरके, झारी संघटनेचे शिवाजीराव पोवार, सोने-चांदी संघटनेचे संपत पाटील, कोल्हापूर सराफ व्यापारी पतसंस्थेचे संजय गुंदेशा, चांदी मूर्तिकारचे शामराव पाटील, सोने-चांदी बदला संघटनेचे भरत पाटील, हॉलमार्क संघटनेचे मंगेश शेटे, बंगाली कारागीर संघटनेचे बिश्वजित प्रामाणिक, पटवेगारचे दिलावर तांबोळी, माजी नगरसेवक ईश्वर परमार, किरण नकाते, नितीन ओसवाल यांचे सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सचिव तेजस धडाम यांनी आभार मानले. संचालक कुलदीप गायकवाड, किरण गांधी, ललित ओसवाल, कुमार ओसवाल, अशोककुमार ओसवाल, विजयकुमार भोसले, संजय रांगोळे, भैरू ओसवाल, सिद्धार्थ परमार, शीतल पोतदार, शिवाजी पाटील यांच्यासह सराफ व सुवर्ण कारागीर यावेळी उपस्थित होते.