Share Now
Read Time:1 Minute, 4 Second
मुंबई/प्रतिनिधी
“सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार सगळ्या समाजाने आदर राखून संबंधित नियमांची अंमलबजावणी करायला हवी. गेली अनेक वर्ष नवरात्र, गणपती उत्सव या काळात देखील हिंदू समाजाने कोर्टाच्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी केली. पुण्यातल्या गणेशोत्सवाला १५० हून अधिक वर्षांची परंपरा आहे. तिथेही विसर्जनावेळी रात्री १० नंतर लाऊड स्पीकर लावला जात नाही. नवरात्र उत्सव काळात देखील रात्री १० नंतर हिंदू समाज लाऊड स्पीकरचा आग्रह धरत नाही. मग जर हिंदू समाज गाईडलाईन्सचं पालन करत असेल तर इतर सर्वच समाजाने सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सचं पालन करावं, असा आमचा आग्रह असेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Share Now