मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी/मुबारक अतार) – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील खासगी कृषीपंपधारक शेतकरी यांनी गेली चार-पाच वर्षे झाली कृषीपंप विज कनेक्शनसाठी पैसे भरूनही अद्याप त्यांना वीज कनेक्शन मिळालेली नाहीत. तर, काही शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी पैसे भरलेले आहेत. पण, अद्याप महावितरणकडून त्यांना कोणत्याच प्रकारचे सहकार्य मिळालेले नाही. शेतकऱ्यांना लवकरात लवकर वीज कनेक्शन देण्याची तरतूद करावी. सर्व शेतकऱ्यांची पेड पेंडिंग वीज कनेक्शन विनाअट ताबडतोब द्यावीत, यांसह आदी मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन केले होते.
बऱ्याच शेतकऱ्यांना पोल, वायर, डीपी आदी बाबींची पूर्तता महावितरणने केलेली नाही. तसेच सहकारी पाणीपुरवठा संस्थांची प्रतियुनिट एक रुपये सोळा पैसे या दराने वीज देण्याचा शासन निर्णय झालेला आहे. त्याप्रमाणे एक मार्चपासून या संस्थांना वीज बिले येत आहेत. पण, सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या वीज बिलातील मागील पोकळ बाकी तशीच आहे. ती निरंक करावी.
- अनेक ठिकाणी विद्युत लोकपाल व ग्राहक निवारण मंच यांनी शेतकर्यांच्या बाजूने निकाल दिलेले आहेत. पण, त्यांची अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत आहे. या आदेशाची ताबडतोब पूर्तता करावी. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे शेतीसाठीचे नवीन वीज मागणी अर्ज स्वीकारणे, महावितरणने बंद केले आहेत. याबाबत त्वरित कारवाई कार्यवाही करून वीज कनेक्शन अर्ज स्वीकारावेत.
या मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा एन. डी. पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये दिला. हे सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आले आहे, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. यावेळी वीज तज्ञ प्रताप होगाडे, सतेज ऊर्फ बंटी पाटील, विक्रांत पाटील किणीकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.