Kolhapur : ‘डॉक्टर डे’ निमित्त डॉक्टरांची रंगली संगीत मैफल; कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजन

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 43 Second

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (शाखा आयएमए) च्या वतीने १ जुलै हा ‘डॉक्टर्स डे’ दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. यावर्षी केमए आर्ट सर्कलच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृह येथे डॉक्टरांची संगीत मैफल रंगली. २० व्या ‘डॉक्टर डे’ निमीत्त हिंदी चित्रपटातील प्रख्यात संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या संगीतावर आधारित ‘मेरे दिल मे आज क्या है’ या संगीत- नृत्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या संगीत – नृत्य सोहळ्यासाठी स्वतः संगीतकार श्री प्यारेलालजी शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘ये पब्लिक है, ये सब जानती है’….लोक आमच्यावर प्रेम करतात म्हणूनच आम्ही इथे आहोत, असे श्री प्यारेलाल यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘सोला बरस की, मेरे दिल में आज क्या है’, ‘रुक जाना नही, सत्यम शिवम, ये जीवन है, मेघा रे मेघा, शिशा हो या दिल हो ,ड्रीम गर्ल,ओम शांती ओम’ अशी एकापेक्षा एक बहारदार गीते आणि नृत्यांचे सादरीकरण डॉक्टर कलाकारांनी केले.

डॉक्टरांचा रोजचा दिवस हा अतिशय व्यस्त असतो. त्यामुळे त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून गेली वीस वर्षे मेडिकल असोसिएशनच्या आर्ट सर्कलमार्फत विविध सांगीतिक कार्यक्रम साजरे केले जातात. यामध्ये डॉक्टर कलाकार उस्फूर्तपणे सहभाग घेतात.सूत्र संचालन डॉ.अमर आडके यांनी केले.

यावेळी अध्यक्ष डॉ.संदीप साळोखे, उपाध्यक्ष आबासाहेब शिर्के, सचिव डॉ.आशा जाधव, डॉ.राजेंद्र वायचळ, डॉ.ए.बी.पाटील, डॉ.रविंद्र शिंदे, डॉ.संजय घोटणे, डॉ. अजित चांदेलकर, डॉ.प्रिया शहा, डॉ.पी.एम.चौगले, डॉ.सरोज शिंदे, डॉ. सूरज पवार यांच्यासह डॉक्टर्स मोठया संख्येने उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *