Pune : कोंढवा भिंत दुर्घटना प्रकरण; ‘त्या’ बिल्डरांना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोंढवा येथे झालेल्या भिंत दुर्घटनेत सुमारे पंधरा जणांचा मृत्यू झाला. यातील संशयित बिल्डरांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विपुल अग्रवाल आणि विवेक अग्रवाल अशी पोलीस कोठडी सुनावलेल्या बांधकाम व्यावसायिकांची नावे आहेत. कोंढवा येथील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बिल्डर अग्रवाल याच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेले सर्व अल्कॉन लँडमार्कस् रजिस्टर संस्थेचे भागीदार आणि कांचन रजिस्टर संस्थेचे भागीदार आहेत. तर विपुल आणि विवेक अग्रवाल यांना अटक केली आहे.

जगदीशप्रसाद तिलकचंद अग्रवाल (वय 64), सचिन अग्रवाल (वय 34), राजेश अग्रवाल (वय 27), विवेक सुनील अग्रवाल (वय 21) विपुल सुनील अग्रवाल (वय 21) पंकज व्होरा, सुरेश शहा रश्मिकांत गांधी यांच्यासह साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर, लेबर कॉन्ट्रॅक्टर व आणखी काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *