Kolhapur : शाळेत गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप समारंभ

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम गुरुवारी (दिनांक 4 जुलै) कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय शाळा नंबर 12 कदमवाडी येथे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटप समारंभ पार पडला. तब्बल 400 वह्‍या भेट स्वरूपात विद्यार्थ्यांना देण्यात आले.

शैक्षणिक दृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे ही सतेज उर्फ बंटी पाटील यांची कृतज्ञता कौतुकास्पद असून मोफत वह्या वाटप हा अभिनव उपक्रमाचे कौतुक शाळेच्या मुख्याध्यापिका खानूलकर यांनी केले, दरम्यान शहरातील सर्व भागातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात येणार असल्याचे नगरसेवक तोफिक मुल्‍लानी यांनी सांगितले.

Advertisements

यावेळी कार्यक्रम उपस्थित प्रमुख पाहुणे नगरसेवक तोफिक मुल्‍लानी सरचिटणीस विद्यार्थी काँग्रेस( NSUI) सत्यजित शेजवळ विक्रम सिंह घाडगे( सरकार) रामचंद्र माने प्रमोद आयवाऴे जावेद सनदी मीना शेजवळ उत्तम भोसले आकीब मुजावर व शाळेचे कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *