Kolhapur : ‘मोहिते सुझुकी’ शो रूममध्ये सुझुकी जिक्सर एस.एफ.250 cc बाईकचे दिमाखात अनावरण

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – ग्राहकांच्या सेवेत नेहमीच आपला ठसा उमठावणाऱ्या ‘मोहिते सुझुकी’ शो रूममध्ये जिक्सर एस.एफ.250 cc या नव्या बाईकचे मोठ्या थाटामाटामध्ये आर.टी.ओ. इन्स्पेक्टर सुभाष देसाई यांच्या हस्ते आज शुक्रवारी (दि. १२) अनावरण करण्यात आले.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, व्यवस्थापक, तरुण वर्ग आदी उपस्थित होते.

तरुणाईला भुरळ घालणाऱ्या जिक्सर SF बाईकच्या अनावरणप्रसंगी युवकांची मोठी गर्दी होती.यावेळी पहिले ग्राहक म्हणून विशाल साळुंखे यांना बाईकची चावी देण्यात आली. यावेळी या नव्या बाईकची माहिती देण्यात आली.

या दिमाखदार सोहळ्यासाठी ‘मोहिते सुझुकी’चे डायरेक्टर अभिषेक मोहिते, कंपनीचे जनरल मॅनेजर राजेंद्र गुरव, आर.टी.ओ. इन्स्पेक्टर सुभाष देसाई, सोहन घोडगिरे, संतोष शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *