Kolhapur : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आज कोल्हापूरमध्ये स्वागत

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झालेनंतर ते आज (शुक्रवार, दि.१९ रोजी) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने प्रदेशाध्यक्ष हे पद प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळाले आहे.

गडहिंग्लज, चंदगड याठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमाठिकाणी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आज (शुक्रवार, दि.१९ रोजी) त्यांचे स्वागत करणार आहेत. त्याचबरोबर दुपारी १ वाजता दसरा चौक येथे भाजपा जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे स्वागत करणार आहेत.

Advertisements

तरी शुक्रवार, दि.१९ रोजी दुपारी १ वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि कोल्हापूरच्या तमाम जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *