पोलीस पेट्रोल पंपावरच गंडा…!

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 26 Second

क्राईम रिपोर्टर मार्था भोसले

कोल्हापूर/प्रतिनिधी : सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी लक्षात घेऊन कसबा बावडा कोल्हापूर यथ अंलकार ,हॉलचे शेजारी पोलीस विभागाने पेट्रोलपंप सुरु केलेला आहे. कोल्हापूर शहरात एकच पेट्रोलपंप दिवसा व रात्री सुरु असतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला वाहनाने प्रवास करणेकरीता दिवसा व रात्री पेट्रोल/डिझेल उपलब्ध झालेले आहे. शिवाय पोलीसांनी चालविलेला पेट्रोलपंप असल्याने त्यांची,जनमानसात विश्वासार्हता आहे.दिनांक २८/०४/२०२२ रोजी १२.३० वा चे सुमारास पवण पप्पु सकट रा. मानेगल्ली विचारेमाळ,कोल्हापूर व आणखीन एक विधी संघर्ष ग्रस्त बालक या दोघांनी मिळुन एफझेड मोटर सायकलमध्ये पेट्रोल भरण्याकरीता पोलीस पेट्रोल, कसबा बावडा कोल्हापूर येथे जाऊन मोटर सायकलमध्ये १०० रुपयेचे पेट्रोल भरण्याकरीता १०० रुपये देतो असे पेट्रोलपंपावरील कामगार यांना सांगुन त्याचा

विश्वास संपादन करुन मोटर सायकलमध्ये १०० रुपयेचे पेट्रोल भरुन घेऊन पैसे न देता पलायन केलेबाबत व पोलीसांना शिवीगाळ केलेबाबत पेट्रोलपंपावरील कामगार पृथ्वीराज गायकवाड यांनी दिले तक्रारीवरुन पवण सकट व त्याचे साथीदाराविरुध्द शाहुपूरी पोलीस ठाणेस आयपीसी ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता.सदर गुन्हयांचे तपासकामी पवण पप्पु सकट रा. मानेगल्ली विचारेमाळ, कोल्हापूर यासशाहुपूरी पोलीसांनी अटक केली असुन विधीसंघर्ष ग्रस्त बालकास नोटीस दिली आहे सदर गुन्हयाचा तपास शाहपुरी पोलीस करत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *