Getting your Trinity Audio player ready...
|
क्राईम रिपोर्टर जावेद देवडी
कोल्हापूर/प्रतिनिधी : साई ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यालय थोरली मशीद, दुसरा मजला, स्टेशन रोड, शाहुपूरी,कोल्हापूर येथे आहे. सदर साई ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत खते व इतर वस्तू यांचे ट्रान्सपोर्ट करीत,असून सदर ट्रान्सपोर्टचा व्यवहार हा मोठ्या प्रमाणात व रोखीने केला जातो. ट्रान्सपोर्टचे व्यवहारातील ३४,५०,०००/- रूपये इतकी रोख रक्कम ट्रान्सपोर्टचे कार्यालयातील लोखंडी तिजोरीतील लॉकरमध्ये ठेवलेली होती. दि. ३१.०३.२०२२ ते दि. २५.०४.२०२२ रोजीचे,दरम्यान मुदतीत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कार्यालयातील लोखंडी तिजोरीतील लॉकरचे लॉक डुप्लीकेट चावीने काढुन लॉकरमधील ३४,५०,०००/- रुपये रोख रक्कम चोरुन नेलेबाबत,ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापक श्री विजय बजरंग मुराडे यांनी दिले तक्रारीवरून दि. २७.०४.२०२२,रोजी शाहुपूरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे.मा. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे सो यांनी ट्रान्सपोर्ट कार्यालयात झालेल्या,धाडसी चोरी लवकरात लवकर उघडकीस येणेकरीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांनी स्था.गु.अ. शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले तसेच,पोलीस अमंलदार रणजित कांबळे, श्रीकांत मोहीते, रणजित पाटील, ओंकार परब, उत्तम सडोलीकर व वैभव पाटील यांचे तपास पथक नेमूण मा. पोलीस अधीक्षक सो यांनी दिले.आदेशाप्रमाणे योग्य त्या सुचना देवून गुन्हा उघडकीस आणणेकरीता योग्य ते मार्गदर्शन केले.त्याप्रमाणे तपास पथकाने सदरचा गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून सदर ठिकाणी काम करणारे कर्मचारी, चोरी झालेले कालावधीत ऑफीसमध्ये कामानिमीत्त आलेले इसम तसेच इतर बाबींचा अभ्यास करून तपास करीत असताना तपास पथकास त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहितीमिळाली की, सदरचा गुन्हा नमुद ऑफीसमध्ये काम करीत असलेले अजित डोंगळे याने व त्याचे साथीदारांनी मिळुन केला असलेबाबत माहिती मिळाली. मिळाले माहितीचे आधारे अधिक तपास,करीत असताना अजय डोंगळे याचे गुन्हा करणेस सहभागी असलेले त्याचे साथीदार ०१ ) पंकज दिलीप विभुते, व.व. २९, रा. छत्रपती शिवाजी गल्ली, कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर व ०२) सलीम राजू मुल्लाणी, व. व. २४, रा. हनुमान गल्ली, कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर हे दि. २८.०४.२०२२ मैदानावर येणार असलेबाबत माहिती मिळालेने त्यांना,दि. २८.०४.२०२२ रोजी तपोवन शाळेचे मैदानावर सापळा लावून त्यांचे कब्जातील गुन्हा,करणेकरीता वापरलेली पांढरे रंगाची अॅक्सेस मोपेड क्र. एमएच-०९-एफएन- ८४६३ मोपेड गाडी,व चोरीतील ९०,०००/- रुपये रोख रक्कमेसह पकडून पुढील कारवाईकरीता शाहुपूरी पोलीसठाणे येथे हजर केले आहेत.तपोवन त्यानंतर नमुद्र तपास पथक सदर गुन्हयातील उर्वरीत पाहीजे असलेले आरोपींचा शोध,घेत असताना आज दि. २९.०४.२०२२ रोजी सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अजय डोंगळे व त्याचा साथीदार मानतेश पाटील, दोघे रा. दिंडनेर्ली, ता. करवीर, जि. कोल्हापूर हे सुभाषनगर,चौक ते आर.के.नगर जाणारे रोडलगत असले कुष्ठधाम इमारतीजवळ येणार असलेची माहितीमिळालेने तपास पथकाने शेंडा पार्क येथील कुष्ठधाम इमारतीचे आसपास सापळा लावून अजय जेजेराम डोंगळे, व.व.३२ व मानतेश मुरलीधर पाटील, व.व. २४, दोघे रा. दिंडनेली,ता. करवीर, जि. कोल्हापूर यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली,२७,००,०००/- (सत्तावीस लाख रुपये रोख रक्कम व सदरचा गुन्हा करणेकरीता वापरलेली,स्प्लेंडर मोटर सायकल व एक स्कॉर्पिओ गाडी असा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस पथकाने नमुद गुन्हा दाखल झालेपासून चोवीस तासाचे आत चार आरोपींना,निष्पन्न करून त्यांना पकडून त्यांचेकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले ३४,५०,०००/-,रुपयापैकी एकूण २७,९०,०००/- रुपये रोख रक्कम व गुन्हा करणेकरीता वापरलेल्या दोन मोटरसायकली व एक स्कार्पीओ गाडी अशी तीन वाहने असा एकूण ३३,८५,०००/- रुपये किंमतीचा,मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे साो, मा. अपर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण कडील पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले, पोलीस अमंलदार,रणजित कांबळे, श्रीकांत मोहिते, रणजित पाटील, ओंकार परब, उत्तम सडोलीकर, संजय पडवळ, संतोष पाटील, अनिल पास्ते, वैभव पाटील, नामदेव यादव, रणजित पाटील, प्रशांत कांबळे, संजय इंगवले, रफिक आवळकर व राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे.